Ration Grain | आता ई-केवायसी न केल्यास रेशन बंद होणार

0
55
#image_title

Ration Grain | सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत गरीब आणि गरजवंतांना अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रक धारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली असून योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध या ई-केवायसीने लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मदत देण्यात आली असून ई-केवायसी न केलेल्यांचे रेशन धान्य 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. 23 सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील रेशन कार्डवरील 16 लाख 32 हजार 785 जणांची ई-केवायसी झालेली नाही.

Ration | १ जानेवारी पासून सर्व रेशन दुकान बंद..!

ई-केवायसी न केल्यास रेशनकार्ड रद्द होणार

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत स्वस्तामध्ये धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना ई-केवायसीचे बंधन घालण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले असून तरी देखील अनेक शिधापत्रिकाधारकांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे आता याबाबतीत सरकारने कठोर नियम करत 1 नोव्हेंबर पासून रेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर शिधापत्रिकाधारकाने 31 ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. याशिवाय अशा पत्रिका धारकांची नावे ही रेशन कार्ड मधून वगळली जाणार असून त्यांच्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत.

Free ration: पुन्हा मोफत रेशन !

त्यामुळे आता पुढील 36 दिवसांमध्ये राज्यातील चार कोटी व्यक्तींची ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. रेशन कार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेक जण स्वस्तातील धान्य घेत आहेत. याशिवाय ज्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रकांवर नमूद आहेत. तर बनावट रेशनकार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील अनेक लोक आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिका धारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकाच्यांची नावे नोंदवलेली आहेत त्या सर्वांना ई-केवायसी करावीच लागणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here