Nashik Crime | नाशिक जिल्हा रुग्णालयात चक्क जिवंत बाळाला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

0
31
#image_title

Nashik Crime | नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात जिवंत बाळाला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जन्मानंतर बाळ न रडल्याने त्याला एसएनसीयु कक्षात तपासणीसाठी नेले असतात तेथे बाळाला मृत घोषित करण्यात आले. परंतु शुक्रवारी सकाळच्या सत्रात आलेल्या परिचारिकांनी कामला सुरुवात केली असता त्यांना बाळ जिवंत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बाळाला तातडीने एसएनसीयु कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांंकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

Nashik Crime | नाशकात महिलेवर चुकीचे उपचार करून डॉक्टरचा नुकसान भरपाई देण्यास नकार

26 तारखेला बाळाचा जन्म झाला होता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिरावाडी परिसरातील त्रिमूर्ती नगर परिसरात एका महिलेने गुरुवारी 26 तारखेला पहाटे बाळाला जन्म दिला होता. बाळाचे वजन सुमारे 2300 ग्रॅम भरले परंतु, जन्मानंतर बाळाने आवाज न केल्याने त्याला एसएनसीयु कक्षात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे तपासणी करून बाळाचा मृत्यू झाल्याचे संबंधितांना सांगण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बाळाला कपड्यात गुंडाळून ठेवत, त्याच्या आईला दुसऱ्या कक्षात हलवले. शुक्रवारी सकाळी दुसरे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना कपड्यात गुंडाळलेल्या बाळाने आवाज केल्याने धक्का बसला. त्यांनी कापड सोडवून पाहिले असता बाळ जिवंत होते. त्यानंतर बाळाला तातडीने एसएनसीयुत उपचारासाठी पाठविण्यात आले.

Nashik Crime | नाशिकच्या जेलरोड परिसरात वैयक्तिक वादातून गोळीबार; एकाला अटक

शुक्रवारी घटना उघडकीस

यानंतर नवजात बाळाला मृत घोषित करून कपड्यात गुंडाळण्याचा प्रकार घडल्याची चर्चा होऊ लागली. परंतु या घटनेची माहिती गुरुवारी दिवसभरात वरिष्ठांपर्यंत गेली नसल्याचेही समोर आले. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी शुक्रवारी संबंधित डॉक्टर व परिचारिकांकडे चौकशी केली असता त्यांना या घटनेची माहिती मिळाली.

“बाळाचा मृत्यू झाला आहे याची नोंद कागदोपत्री केलेली नसून चौकशीतून बाळाची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. तरी या संदर्भात चौकशी समिती नेमली असून पाच दिवसात अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर या घटनेची माहिती स्पष्ट होईल.”
डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here