Nashik Crime | चुकीचे उपचार करून डॉक्टरने रुग्णास नुकसान भरपाई देण्यास नकार देत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील एका रुग्णालयात घडला आहे. परप्रांतीय महिलेवर चुकीचे उपचार केल्यानंतर तिला नुकसान भरपाई देण्याचे मान्य करून कालांतराने पैसे देण्यास इन्कार करत डॉक्टर कडून रुग्णावर शिवीगाळ करण्यात आली आहे.
Nashik Crime | नाशिकच्या जेलरोड परिसरात वैयक्तिक वादातून गोळीबार; एकाला अटक
सौम्या शशीधरण नायर यांच्या फिर्यादीनुसार, पौर्णिमा बसस्टॉप जवळील संतोष मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे 2023 मध्ये सौम्या नायर पित्ताशयात खडे झाल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी रुग्णालयातील संशयित डॉक्टर संतोष रावलानी याने शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणे रुग्णाची पित्तनलिका कापून रक्तवाहिनिस छेडछाड केली. ज्यामुळे पित्तानलिकेला दुखापत झाली.
Nashik crime | नाशकात चोरट्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळेवर डल्ला
चुकीची शस्त्रक्रिया करून रुग्णाला अंधारात ठेवले
शस्त्रक्रियेत असे घडून देखील डॉ. रावलानीने सौम्या यांच्यापासून ही बाब लपवून ठेवली. त्यानंतर त्रास होत असल्याने सोम्या यांनी नाशिक व पुणे येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार केले असता त्यांना चुकीच्या उपचार झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर रावलानीला जाब देखील विचारला. तेव्हा डॉक्टरने त्यांची चूक मान्य करत नुकसान भरपाई म्हणून 11 लाख रुपये देण्यास मान्य केले होते. त्यानुसार सौम्या या पैसे घेण्यासाठी डॉक्टर रावलानीकडे गेल्या असता डॉक्टरने सोम्या यांना शिवीगाळ करत “कुठेही जा मी तुला एक रुपया देणार नाही. तसेच महाराष्ट्रात सुद्धा राहू देणार नाही.” अशी धमकी दिली. तसेच सौम्या यांचे वडील शशीधरण नायर यांच्यावर मारहाण करण्यासाठी धावून गेले. याप्रकरणी आता भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर संतोष रावळ यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम