Nashik Crime : राज्यामध्ये स्त्रीअत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. मात्र गुन्हेगारांना कठोर शासन करणाऱ्या कायद्यांअभावी समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती अधिक बळावत चालली आहे. असाच एक प्रकार नाशिकमध्येही उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी योगेश माळी ओझर येथील पोलीस कोठडीत होता. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात नेत असताना लघुशंकेच्या बहाण्याने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी हातातील बेड्यांसह पोलिसांच्या आवारातून फरार झाला असून मंगळवारी सायंकाळी 5:30 च्यासुमारास ही घटना घडली. त्यानंतर पोलीस प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही संशयित आरोपी सापडला नव्हता.
Nashik crime | नाशिकमध्ये भर रस्त्यात गायीवर अत्याचार; 26 वर्षीय तरुणाला अटक
कुठे घडली होती घटना?
कसबे सुकेने येथे काही दिवसांपूर्वी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी योगेश माळी याला अटक करण्यात आली होती. ओझर येथील पोलीस कोठडीत त्याला ठेवण्यात आले होते. न्यायालयाकडून मंगळवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत संशयित आरोपी हातातील बेड्यांसहित पोलीसांच्या आवारातून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम