Nashik crime | नाशिकमध्ये भर रस्त्यात गायीवर अत्याचार; 26 वर्षीय तरुणाला अटक

0
80
#image_title

Nashik crime : राज्यामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे सत्र संपत नाहीये तोवर एका धक्कादायक घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशकात एका 26 वर्षाच्या तरुणाने चक्क एका मुक जनावरावर अत्याचार केल्याची संतप्तजनक घटना घडली आहे. आरोपींनं त्या निष्पाप जीवाचं लैंगिक शोषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटने प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या सातपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून एका विकृत तरुणाकडून गायीवर अत्याचार होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. व्हिडिओच्या आधारे संशयित आरोपीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून चक्रधर नारायण ठाकरे असे त्याचे नाव आहे. सोशल मीडियावर घटना व्हायरल होताच परिसरातील संतप्त नागरिकांनी संशयित आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

Nashik Crime | धक्कादायक! नाशकात पित्याकडूनच गतिमंद मुलीवर अत्याचार

Nashik Crime | दहा वर्षाच्या चिमुकलीवर देखील अत्याचार

तर चंद्रपूरमध्ये दहा वर्षाच्या चिमुकलीवर ओळखीच्या व्यक्तीकडून अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी 23 ऑगस्टला आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांच्या चौकशीनंतर जन्मदात्या पित्याकडूनही वारंवार लैंगिक अत्याचार झाले असल्याचे धक्कादायक सत्य बाहेर आले. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी नराधम बापाला देखील बेड्या ठोकल्या आहेत.

Nashik Crime | नाशकात चिमुकलीला ओरबाडले; बदलापूरनंतर नाशिकमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

पित्याकडूनही वारंवार अत्याचार

पीडित मुलगी तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असून ती आपल्या आई-वडिलांसोबत वल्लभनगर येथील तामसवाडी गावात राहणाऱ्या नातेवाईंकडे आली होती. तेव्हा नातेवाईकांतील यश गवई या तरुणाने तिच्यावरती अत्याचार केला व या प्रकरणाची वाचता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा सर्व प्रकार पीडित मुलीने घरी येऊन सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली. या अगोदर देखील एक वर्षांपूर्वी आरोपींना तिच्या राहत्या घरी चिमुकलीवर अत्याचार केला होता. सध्या आरोपी गवईला वल्लभनगरातून पोलिसांनी अटक केली असून तो कारागृहात आहे. या प्रकरणी ठाणेदार गजानन राठोड व पोलीस निरीक्षक चंद्रकला मेसरे यांनी पीडित मुलीशी बोलणे केले असता घरात कोणी नसताना दारू पिऊन वडिलांनी देखील वारंवार अत्याचार केल्याचे दहा वर्षीय चिमुकलीने पोलिसांपाशी कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी नराधम पित्यालाही पोक्सोअंतर्गत, बलात्कार केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (Nashik Crime)

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here