Deola | लोहोणेर येथील पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी उ.बा.ठा. गटाचे उपोषण

0
23
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील लोहोणेर गावातील नागरीक विविध मूलभूत समस्यांपासून वंचित असून, त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) शाखा प्रमुख रितेश वाघ यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन वाघ यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदारांना दिले आहे.

त्यात गावातील बंद असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची दुरूस्ती करण्यात यावी, खालच्या आदिवासी वस्तीमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी, यामुळे साथरोग पसरण्याचा धोका आहे. तसेच आदिवासी वस्तीमधील असलेल्या शौचालयांची पडझड झाली आहे. यामुळे महिलांची गैरसोय होत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

Deola | कै. शरद जोशींची 89 वी जयंती कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात साजरी

Deola | गावातील अपूर्ण कामे पुरी करावे अशी मागणी

माळीघाटाचे सुशोभीकरण करावे व त्या ठिकाणी देवस्थान असल्याने तिथे कचरा टाकण्यावर ग्रा.पं.ने बंदी करावी, गावअंतर्गत अपूर्ण रस्त्याचे कॉंक्रेटिकरण करावं, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी ग्रा.पं.कडून गावात नियमित फवारणी करावी, वरच्या आदिवासी वस्तीजवळ असलेल्या शौचालायची दुरअवस्था झाली असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी, लोहोणेर गावातील स्मशानभूमीतील पत्रा शेडची दुरअवस्था व डागडुजी करावी. वरील समस्या ग्रामसभेत मांडलेल्या आहेत. तरीही आजपर्यंत त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी नाईलाजाने वरील समस्यांच्या पूर्ततेसाठी व झोपी गेलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी वाघ यांनी दि. ०5 पासून ग्रामपंचायत कार्यालय आवारात धरणे आंदोलन पुकारले आहे.(Deola)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here