सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | शेतकऱ्यांचे पंचप्राण कै. शरद जोशी यांची ८९ व्या जंयती विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात साजरी करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने कै. जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने कै. शूरद जोशी यांच्या जंयती निमित्ताने अभिवादन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे उपस्थित होते.
Deola | देवळा बस स्थानकावर शुकशुकाट; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सामान्यांना फटका
Deola | चेअरमन जाधवांनी कै. जोशींच्या जनजागृतीची माहिती दिली
यावेळी सोसायटीचे चेअरमन कुबेर जाधव यांनी कै. शरद जोशी यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या जनजागृती विषयी माहिती दिली. “स्वातंत्र्यानंतर भारतीय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत ते स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष झाले तरी जैसे थे आहेत. कै. शरद जोशी नेहमी म्हणायचे की ‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण आहे.’ त्यांचे म्हणणे ऱ्हास्तच होते.”
Deola | देवळ्यात तहसीलदार मिलिंद कुलकर्णींच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्तावास संमती
कै. जोशी यांच्या जयंतीला यांनी उपस्थिती लावली
कै. जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष फुला जाधव, सोसायटीचे संचालक प्रशांत निकम, अभिजित निकम, शशीकांत निकम, भिका शेळके, महारु निकम, कैलास कोकरे, पि. डी. निकम, विलास निकम, भास्कर निकम, कौतिक निकम, पुंडलिक निकम, सुनिल निकम, ईश्वर निकम, गोरख पगार, ग्यानदेव पगार, गोटु निकम, काशिनाथ बोरसे, निंबा निकम, महेंद्र जाधव, वसंत निकम, सचिव संजय निकम, सुभाष पगार, सतिष निकम आदींसह शेकडो शेतकरी संघटनेचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम