Nashik Crime News | नाशिकमधील नामांकित महाविद्यालयाची शिपायाकडून फसवणूक; लाखोंची हेराफेरी

0
48
Nashik Crime News
Nashik Crime News

Nashik Crime News :  मागील काही महिन्यांत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना समोर येत असून, यातच आता नाशिक शहरातील एका नामांकित महाविद्यालयातून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या शिपायाने विद्यार्थी आणि पालकांना महाविद्यालया एवजी स्वतःच्या बँक खात्याचा तपशील देऊन शैक्षणिक फीची रक्कम ही स्वतःच्या खात्यात जमा करून घेत लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Nashik Crime News)

Nashik Crime News | नेमकं प्रकरण काय..?

नाशिकमधील नामांकित भोंसला मिलिटरी स्कूल (Bhonsala Military School, Nashik) येथे हा प्रकार घडला असून, येथील विलास भास्कर आहेर नामक शिपायाने मे 2023 ते डिसेंबर 2023 या काळात महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू असताना स्वतःचे बँक खाते महाविद्यालयाचे असल्याचे सांगत व महाविद्यालयाच्या बँक खात्याएवजी स्वतःच्या बँक खात्याचा नंबर देत तब्बल 44 लाख 8 हजारांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) संशयित शिपायाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Nashik News | चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीला अपघात; एकाच मृत्यू, ३ गंभीर जखमी

असा झाला फसवणुकीचा उलगडा 

महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची फी जमा न झाल्याने प्रशासनाने त्यांना फी जमा करण्यास सांगितले असता त्यांनी ऑनलाइन माध्यमातून फी जमा केल्याचे सांगितले. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तपास केला असता, लेखा परीक्षणामध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महाविद्यालयाच्या व्यवस्थापने तातडीने गंगापूर पोलीस ठाणे गाठत शिपायाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस सविस्तर तपास करत आहेत. (Nashik Crime News)

NCP Nashik | नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here