Tejas Thackeray | पवारांचा नातू ‘ड्रायव्हर’ अन् ठाकरेंचा नातू ‘नाच्या’; भाजप आमदाराची सडकून टिका

0
30
Tejas Thackeray
Tejas Thackeray

Tejas Thackeray | मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या विवाहाचे कार्यक्रम पार पडत असून, या विवाहसोहळ्याची देशभरात चर्चा आहे. या विवाह सोहळ्यासाठी देश, विदेशातून दिग्गज मान्यवर हजेरी लावत आहेत. नुकताच अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट यांचा संगीत कार्यक्रम पार पडला असून, या संगीत कार्यक्रमात राजकीय नेत्यांपासून बॉलीवूडच्या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनीच हजेरी लावली होती.

मात्र, आता या संगीत कार्यक्रमावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे अनंत आणि राधिका यांच्या संगीत कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनीही हजेरी लावली होती, एवढेच नाहीतर या कार्यक्रमात चक्क तेजस ठाकरे यांनी नृत्यही केला होता. त्यांच्या या डान्सची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरे हे ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘ये लड़की, हाए अल्लाह’ या गाण्यावर डान्स करताना दिसून आले. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टिका केली आहे.

Nitesh Rane | बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार – आ. राणे

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या नुकत्याच पार पडलेल्या संगीत सोहळ्याला उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यात काही अभिनेत्यांसह तेजस ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांचा धाकटा नातू वीर पाहारिया हादेखील मंचावर थिरकताना दिसले. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावरून तेजस ठाकरे हे टीकेचे धनी होत आहेत. (Tejas Thackeray)

Tejas Thackeray | पवारांचा नातू ड्रायव्हर आणि ठाकरेंचा नातू नाच्या 

 दरम्यान, यावरून आता सत्ताधाऱ्यांनीही ठाकरेंवर टिका केली असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी तेजस ठाकरे यांचा ‘नाच्या ठाकरे’ असा उल्लेख केला आहे. तर, यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरही टिका केली असून, त्यांना ‘आदानींचा ड्रायव्हर’ असे म्हटले आहे. “रोहित पवार यांनी आता आदानींच्या ड्रायव्हरची नोकरी सोडावी. गेली अडीच वर्ष ते समृद्धी महामार्गाबाबत गप्प का बसलेले होते..?. शरद पवार यांचा नातू आदानींचा ड्रायव्हर होतो आणि आता ठाकरेंचा नातू अंबानीच्या लग्नात नाचतो. एक नातू ‘ड्रायव्हर’ आणि दुसरा नातू ‘नाच्या’ आणि मग परत यांनी गुजरात्यांना शिव्या घालायच्या. त्यांना आता ‘नाच्या ठाकरे’ असं नाव द्यावं” अशी खोचक टीका नितेश राणे यांनी तेजस ठाकरे आणि रोहित पवार यांच्यावर केली.(Tejas Thackeray)

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here