Nashik News | नाशिकमधून गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत नाशिकमधील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थीनींचा विनयभंग केला आहे. या शिक्षकाने शालेय सहलीदरम्यान दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nashik News | नेमकं प्रकरण काय..?
मिळलेल्या अधिक माहितीनुसार, या आरोपी शिक्षकाच्या विरोधात नशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोक्सोनुसार कायद्यांतर्गत विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळा प्रशासनाने या आरोपी नाराधम शिक्षकास निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik News | …अन्यथा नशिक महानगर पालिकेची ‘सिटीलिंक’ बंद पाडू
नशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील एका नामांकित शाळेची शालेय सहल ही जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग येथे गेली होती. यावेळी प्रवासाच्या दरम्यान, ५ जानेवारी रोजी मध्यरात्री आरोपी शिक्षक भाऊसाहेब सानप (वय – ५५ वर्षे) याने सातवी आणि आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप या संबंधित विद्यार्थिनींनी केला आहे.(Nashik News)
यानुसार, ५ जानेवारीला प्रवास करत असताना मध्यरात्री पान खाऊन बसच्या खिडकीतून बाहेर थुंकण्याचा बहाणा करत या शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केला असून, या प्रकरणी विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार संशयित शिक्षकाच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांनी पोक्सो, विनयभंग व अॅट्रोसिटी या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.
Nashik News | नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
दरम्यान, या शालेय सहलीनंतर संबंधित विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना ही घटना सांगितली. मात्र त्यांच्या पालकांनी तक्रार दाखल करण्यास उशीर केला असून, या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. तर, प्रकरण समोर आल्यानंतर शाळा व्यवस्थापनानेही या प्रकरणाची चौकशी करुन या शिक्षकास निलंबित केले आहे. या घटनेचा सविस्तर तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ हे करत आहेत.(Nashik News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम