Nashik Crime | नाशिक हादरलं..! घरात घुसून तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही खबर नाही

0
102
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime | नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी, गाड्यांची तोडफोड आणि खुनाच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच आता नाशिकमधून आणखी एक हादरवणारी घटना समोर आली असून, नाशिक शहरातील गंजमाळ (Ganjamal) परिसरातील पंचशीलनगर येथे घरात घुसून एका १८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे.

Nashik Crime News | नाशिकमध्ये काम सांगितल्याच्या रागातून वेटरचा हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील गंजमाळ परिसरातील पंचशील नगर येथे १८ वर्षीय पांडू शिंगाडे या तरुणाची त्याच्या घरात घुसून हत्या करण्यात आली आणि विशेष म्हणजे यावेळी त्याचा भाऊ त्याच्या शेजारी झोपलेला होता आणि हे त्यालाही कळाले नाही. भरवस्तीत ही घटना घडली असून, यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे. या तरुणाच्या हत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हत्या करून हल्लेखोर फरार झाले असून, या प्रकरणी अज्ञातांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News | वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिकमध्ये तणाव; पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here