Nashik Crime News | वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिकमध्ये तणाव; पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात

0
20
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime News :  दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने नाशिकच्या पंचवटी परिसरात आज पहाटेच्या सुमारास काही वादग्रस्त पत्रके टाकण्यात आली. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील फुलेनगर येथे हा प्रकार घडला असून, या पत्रकांमध्ये विशिष्ट समाजाला हिणवण्याच्या उद्देशाने ही पत्रके तयार करण्यात आली होती. यामुळे नागरिक संतप्त झाले आणि या पत्रकांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती असल्याने काहीकाळ या भागात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. (Nashik Crime News)

शहरातील हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटनेकडून ही पत्रके वाटण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेविरोधात रिपाइचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही नाशिक दौऱ्यावर असताना ही घटना घडली असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत पुढील तपास केला. वैयक्तिक वादातून संबंधित व्यक्तीला अद्दल घडविण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे समोर आले आहे. तसेच या कथित पत्रकात एक इमारत देखील होती. त्या इमारतीला इजा पोहोचवण्याचाही उद्देश्य असल्याचे दिसून आले.

Nashik Teachers Constituency | इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या मैदानात थेट मुख्यमंत्र्यांची एन्ट्री

Nashik Crime News | एका मंदिराबाहेर लावलेला स्तंभ काढा..?

तसेच शहरातील एका मंदिराबाहेर लावलेला स्तंभ काढावा. अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला होता.
ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील आक्षेपार्ह मजकुरामुळे नागरिक संतप्त झाले आणि या विरोधात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पंचवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले.(Nashik Crime News)

सुमारे २ तास हे प्रकरण सुरू होते. ते संपूर्ण शहरात पसरल्याने अन्य भागातही तणाव निर्माण होण्याची असून, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आज नाशिक दौऱ्यावर असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगत हे प्रकरण शांत केले. शरात तणाव वाढू नये, सामाजिक एकोप्याला बाधा पोहोचू नये यासाठी पोलिस प्रशासन सक्रिय असून, सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन नाहीक शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Nashik Crime | नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here