Nashik Crime News | नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, काही दिवसांपूर्वीच नंदगावमध्ये पत्नीने कुटुंबीयांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही घटना ताजी असतानाच आता आता नाशिकरोड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिक शहरातील नाशिकरोड (Nashikroad) परिसरात दिवसाढवळ्या वेटरने एका हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात हॉटेल चालक गंभीर जखमी झाले असून, हॉटेलमध्ये कामाला असलेल्या वेटरला (Waiter) काम सांगितल्याच्या रागातून या संशयित वेटरने व त्याच्या साथीदाराने हॉटेल चालकावर हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik Crime News | वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिकमध्ये तणाव; पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात
Nashik Crime News | नेमकं प्रकरण काय..?
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाममागे (Muktidham) जखमी हॉटेल चालक नितीन हासानंद सचदेव हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा या नावाने त्यांचे हॉटेल चालवत आहेत. त्यांच्या या हॉटेलमध्ये डॅनिअल उर्फ डॅनी थोरात हा हल्लेखोर वेटर काम करत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मालकाणे या वेटरला ग्राहकांकडे आणि कामाकडे नीट लक्ष देण्यास सांगितले.
याचा राग आल्याने वेटरने मालकासपबत हुज्जत घालत शिवीगाळ केली आणि “थांब तुला बघून घेतो”, असा दमही त्यांना दिला. ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात तब्बल सात जण हॉटेलमध्ये घुसले. यावेळी हॉटेलचे चालक नितीन सचदेव हे काउंटरवर बसलेले असताना त्यांना काही समजण्याच्या आतच या टोळक्याने कोयता, रॉड व इतर हत्याराने त्यांच्यावर वार केले. (Nashik Crime News)
हॉटेल चालक आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले असता हे हल्लेखोरही त्यांच्या मागे पळाले. भरदिवसा हा थरार नाशिकरोड परिसरातील रस्त्यांवर सुरू होता. यानंतर नागरिकांनी त्यांना नाशिकरोड येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या हल्ल्यात हॉटेल चालक नितीन सचदेव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे आणि त्यांना १५ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Nashik Crime News)
Nashik Crime | नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले
पोलिसांनी तातडीने फिरवले तपासाचे सूत्र
या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस (nashik Police) घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने तपासाचे सूत्र फिरवत तीन संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस करत आहेत.(Nashik Crime News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम