सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने खर्डे ता. देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात गरजू विध्यार्थ्यांना वह्या, पेन वाटप करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नातून स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील दिव्यांग बांधवाना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्येक्ष लाभ झाला असून, या माध्यमातून दिव्यांगांना मोठा आधार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आ. कडू हे दिव्यांगांचे कैवारी असल्याने तालुका दिव्यांग संघटनेच्या वतीने शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आ. बच्चू कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम