Nashik Crime | नाशकात चिमुकलीला ओरबाडले; बदलापूरनंतर नाशिकमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

0
101
Nashik Crime
Nashik Crime

नाशिक : कोलकत्ता आणि बदलापूर येथे घडलेल्या विकृत घटनांतून देश सावरत नाही तोवर नाशकातूनही अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. मंगळवारी बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. चार वर्षांच्या चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी संपूर्ण बदलापूर रस्त्यावरती उतरलं होतं. इतक्या संवेदनशील प्रकरणावर प्रशासनाचा ढोबळ कारभार पाहून संतप्त नागरिकांनी जवळजवळ 11 तास आंदोलन केलं परंतु हे आंदोलन संपत नाही इतक्यात अशीच मन हे लावून टाकणारी आणखीन एक घटना समोर आली. नाशिक मधील साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून लैंगिक शोषण करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण आता उघडकीस आल आहे.

Badlapur School Case | आंदोलनाची ‘बदलापूर फाईल्स’; आतापर्यंत नेमकं काय काय घडलं..?

गेल्या 24 तासात बदलापूर सारखीच घटना समोर आल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. विकृत नराधमाकडून आपल्या घरासमोर खेळत असलेल्या साडेचार वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अत्याचार करणारा नराधम हा पीडित चिमुकलीच्याच गावात राहणारा असल्याची बाब समोर येत आहे.

चिमुकलीचे अपहरण झाल्याचे समोर येतात कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. नाशिक मधील वावी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? 

नाशकातील, सिन्नरमधील मरोळ गावात ही दुर्दैवी घटना घडली. सोमवारी सायंकाळी पीडित चिमुकली आपल्या घरासमोर खेळत असताना त्याच गावातील एक परिचित तरुणाकडून चिमुकलीचे अपहरण झाल्याचे चित्र समोर आले. टिल्लू असे त्या नराधमाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. आपली लहान मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिला शोधण्यास सुरुवात केली, तेव्हा अपहरण झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. याच वेळेस नराधम टिल्लू ही बेपत्ता असल्याचा संशय कुटुंबीयांना आला व त्यांनी लगेचच पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Badlapur Child Abuse | बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडवर

पोलिसांकडून त्वरित कारवाही

वावी पोलीस ठाण्यात आपली चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांकडून दाखल करण्यात आली. परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ आपली सूत्र हलवली व दुसऱ्या दिवशी नराधम तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले व चिमुकलीला सोडवले. चिमुकलीची सुटका करताच तातडीने तिला रुग्णालयात हलवण्यात आले उपचारांती तिला कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.

पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. मंगळवारी बदलापूर मध्ये घडलेली घटना आणि आता नाशिक मध्ये घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून, राज्यातील जनता प्रशासनाकडून स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबतीत कठोर शिक्षेची अपेक्षा करीत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here