Badlapur School Case | आंदोलनाची ‘बदलापूर फाईल्स’; आतापर्यंत नेमकं काय काय घडलं..?

0
52
Badlapur School Case
Badlapur School Case

Badlapur School Case | काल सकाळपासून बदलापूर प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणी दिवसभरात अनेक थरारक बाबी उघडकीस आल्या. दिवसभर हे प्रकरण चांगलंच तापलं. पालकांनी शांततेत सुरू केलेल्या या आंदोलनाला दुपारच्या सुमारास हिंसक वळण लागलं आणि रेल्वे स्टेशनवर दगडफेक, संबंधित शाळेची तोडफोड, इत्यादि घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी संध्याकाळी बळाचा वापर केला आणि लाठीचार्ज केला. दरम्यान, काल दिवसभर आंदोलनात काय झालं. शाळेच्या गेटवरील आंदोलन, घोषणबजी ते तोडफोड, दगडफेक आतापर्यंत नेमकं काय घडलं..?

Badlapur School Case | बदलापूर आंदोलनाचा घटनाक्रम  

बदलापुर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर शिपायांकडून लैंगिक अत्याचार झाले. याच्या निषेधार्थ सकाळी 6.30 वाजता संतापलेले पालक हजारोंच्या संख्येने शाळेबाहेर जमा होण्यास सुरूवात झाली. यानंतर सकाळी 7.30 वाजता वातावरण तापलं आणि शाळेबाहेर संतप्त नागरिकांची गर्दी उसळली. सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास हे आंदोलन केवळ शाळेपुरतं मर्यादीत न राहता आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन गाठलं आणि आंदोलकांनी रेल्वे रूळांवर उतरून रेल रोको केले. सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेची दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली.

Badlapur Case | अशा नराधमांना पब्लिकली फाशी द्या, सुप्रिया सुळेंचा संताप; आंदोलन चिघळलं

फाशीचा दोर घेऊन आंदोलक रेल्वेरूळांवर

सकाळी 12.00 वाजता रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची बदलापुरात आले. त्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. त्यांची समजूत घालत रेल्वे रुळावरून बाहेर येण्याचं आवाहन केलं. परंतु आंदोलकांचा आपल्या मागण्यांवर ठाम होते. ‘फाशी फाशी’ ही एकच घोषणा आंदोलकांकडून दिली जात होती. फाशीचा दोर घेऊन आंदोलक रेल्वेरूळांवर उतरले होते.

रेल्वे स्टेशनवर, पोलिसांवर दगडफेक 

दुपारी 12.45 वाजेच्या दरम्यान संतप्त जमावाने पुन्हा संबंधित शाळेकडे कूच करत शाळेचं गेट तोडलं आणि शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. दुपारी 1.00 वाजता रेल्वे रूळांवरील आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले असता आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवर, रेल्वे रुळावर दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलीस आणि आंदोलकदेखील जखमी झाले आहेत.

दुपारी 1.10 वाजता शाळेबाहेर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दुपारी 2.00 वाजता ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे बदलापुरात आले आणि त्यांनी बदलापुरातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आंदोलकांनी ‘फाशी फाशी, वि वॉण्ट जस्टीस’ अशा जोरदार घोषणा देत आयुक्तांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

Badlapur Case | लाडक्या बहिणींना पैसे नको सुरक्षा द्या; शाळेत तीन वर्षांच्या चिमूकल्यांवर अत्याचार

मंत्री गिरीश महाजनांचे आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न 

दुपारी 3.45 वाजता मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी दाखले झाले. त्यांनी संबंधित दोषींवर कडक कारवाईचं आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचंही आश्वासन दिलं. गिरीश महाजनांसमोरही आंदोलकांची घोषणाबाजी कायम.

दुपारी 4.30 वाजता कारवाईत टाळाटाळ करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांचे तातडीने निलंबन. मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका, दोन आया यांचे निलंबन. शाळेवर प्रशासक नेमण्याचे आदेश.

आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचा

संध्याकाळी 5.50 वाजता बदलापूर रेल्वे स्टेशनवर ठिय्या मांडून असलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज. रेल्वे पोलीस, राज्य राखीव पोलीस दलासह बदलापूर पोलिसांनी बळाचा वापर करत रेल्वे स्टेशनवरील आंदोलकांना पांगवलं आणि रेल्वे स्टेशन रिकामं करून घेतलं.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here