Nashik Crime News | नाशिकमध्ये पोलिसाच्या मुलाचीच दगडाने ठेचून हत्या

0
87
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime News : सकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंचवटी परिसरातील दिंडोरी रोडवर असलेल्या मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसाहतीगृहामागे आर्थिक व्यवहारावरून गगन प्रवीण कोकाटे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मृत तरुण सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असल्याची बाब पोलीस तपासानंतर उघडकीस आली आहे.(Nashik Crime News)

Nashik Crime News | संशयितांचा शोध सुरू

पंचवटी परिसरात ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नाशिकचे गुन्हे शाखेतील उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त पद्मजा बढे (पंचवटी विभाग) व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आपल्या पोलीस सहाय्यकांसह घटनास्थळी पोहोचले. संशयित आरोपींना शोधण्यासाठी श्वानपतकाचीही नेमणूक करण्यात आली असून आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here