Nashik Citilink | नाशिकची लाईफलाइन बंद पडण्याच्या मार्गावर; नेमकं प्रकरण काय..?

0
69
Nashik Citilink
Nashik Citilink

Nashik Citilink | नाशिक महापालिकेने मोठा तामझाम करत शहरात सिटीलिंक बससेवा ८ जुलै २०२१ रोजी सुरु केली होती. मात्र, आतापर्यंत तब्बल १० वेळा सिटीलिंक बससेवा ही वाहकांच्या संपामुळे ठप्प पडल्याचे नाशिककरांनी पाहिले आहे. दरम्यान, आता सिटीलिंक कंपनीच्या धांदट कारभारामुळे पुन्हा एकदा नाशिकची ही लाईफलाइन बंद पडण्याच्या मार्गावर आली आहे. (Nashik Citilink)

Nashik Citilink | नेमकं प्रकरण काय..?

याचे कारण असे की, येत्या सात जुलैला वाहक कंत्राट हा संपणार आहे. मात्र, तरीही आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आलेला नाही किंवा तशी काही हालचालही नाही. त्यामुळे आता आपसुकच ही बससेवा बंद पडणार असल्याचे दिसत आहे. कंत्राट संपण्यासाठी अवघे पाच दिवस बाकी असल्याने आता सिटीलिंक कंपनी प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांची एकच धावपळ उडाली आहे. मात्र, असे असले तरीही कुठल्याही परिस्थितीत बससेवा बंद पडणार नसल्याचा ठाम दावाही कंपनी प्रशासन करत आहे.

नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंकच्या माध्यमातून सध्या शहरात तब्बल २०० सीएनजी आणि ५० डिझेल बस सुरू आहेत. या बसेससाठी वाहक पुरवठा करण्याचे काम आऊटसोर्सिंग करण्यात आले असून, ते मॅक्स डिटेक्टिव्ह अॅण्ड सिक्युरिटीज या कंपनीला देण्यात आला असून, आता हा कंत्राट येत्या ७ जुलैला संपणार आहे. (Nashik Citilink)

Citilink strike : नाशिक शहराची वाहतूकवाहिनी पुन्हा ठप्प ; बससेवा बंद असल्याने प्रवाश्यांचे हाल

आतापर्यंत दहा वेळेस संप 

संबंधित ठेकेदाराकडून नियमित वेळेत वाहकांना वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्य निर्वाह निधीची रक्कम न देणे, कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई यामुळे आतापर्यंत एक-दोन नव्हे तर तब्बल दहा वेळेस वाहक आणि चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एकूणच सिटीलिंकच्या या कार्यपद्धतीवर नाशिककर नाराज आहे. यातच आता सिटीलिंक कंपनीसमोर नवे संकट उभे ठाकले असून, आता पुढील आठवड्यात बससेवा पूर्णपणे ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. (Nashik Citilink)

या बसेससाठी दीडशे वाहक पुरवण्याचे काम हे मॅक्स डिटेक्टिव्ह अॅण्ड सिक्युरिटीज या दिल्लीतील कंपनीला देण्यात आले असून, या कंपनीसोबतचा करार हा यत्या सात जुलैला संपणार आहे. तर, आचारसंहितेमुळे नवीन करार करता येत नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया उघडणे, ठेकेदारासोबत वाटाघाटी करणे, पत्रव्यवहार करणे, दीड कोटींची बँक हमी भरून घेणे, करार करणे, कार्यारंभाचे आदेश देणे आणि त्यानंतर वाहकांना प्रशिक्षण आणि भरती करणे या सर्व प्रक्रिया आचारसंहितेमुळे पार पाडता येत नसून, आता तेवढा अवधीही शिल्लक नाही.

तर, जुन्या कंत्राटदारालाच मुदतवाढ द्यायची असल्यास करारातील अटी व शर्तीनुसार मुदतवाढ ही थेट दोन वर्षासाठी द्यावी लागेल आणि सात तारखेपर्यंत नवीन ठेकेदाराची नियुक्ती न झाल्यास वाहकांचे काम बंद होईल आणि वाहक नसल्यामुळे आपसुकच या दीडशे बसेस बंद पडतील. दरम्यान, जर कंत्राट संपणार असल्याचे कंपनीला आधीच माहिती होते. तर, यासाठी कंपनीने आचारसंहिता लागण्यापूर्वीच काही पर्याय का तयार केले नाही. आता केवळ पाच दिवसांत काय होणार..? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Nashik Teachers Constituency Result |’साहेब तुमचा शब्द खरा ठरला, उबाठा..’; विजयानंतर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा फोन


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here