Citilink strike : नाशिक शहराची वाहतूकवाहिनी पुन्हा ठप्प ; बससेवा बंद असल्याने प्रवाश्यांचे हाल


Citilink Strike नाशिक महापालिकेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या सिटिलंक ही शहर बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. पगार मिळत नसल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केल आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा पहाटेपासून बससेवा बंद आहेत. यामुळे सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांसह, चाकरमानी व नाशिककरांचे प्रचंड हाल होत आहेत.(Citilink Strike)

वेतन मिळत नसल्याने सिटीलिंगच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. मागील महिन्यात देखील या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे सलग २ दिवस बससेवा ठप्प झाली होती. आता पुन्हा काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी हाती घेतल आहे.(Citilink Strike)

कंत्राटदार वेळेत वेतन देत नसल्याने आता सिटीलिंक कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मागील आंदोलना दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये कंत्राटदाराने थकीत वेतन तातडीने अदा केले जाईल अस आश्वासन दिले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही कंत्राटदाराने अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे.(Citilink Strike)

https://thepointnow.in/dindori-yuva-samvad/

सिटिलिंक बसने दररोजच लाखो प्रवासी या शहर बससेवेचा लाभ घेत असतात. रोज सकाळच्या सुमारास नाशिक शहराच्या विविध भागांमधून शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, सरकारी किंवा खासगी कर्मचारी, तसेच अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणारे कामगार, रेल्वे स्टेशन येथे जाणारे प्रवासी आदी या बससेवेचा लाभ घेतात.

या संपामुळे मात्र सर्वांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने महापालिका आयुक्तांनी आता पुढाकार घेऊन तातडीने हा संप मिटवावा आणि शहराची जीवनवाहिनी असलेली ही बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.(Citilink Strike)

सिटीलिंक ही नाशिक शहरासाठी सुरू करण्यात आलेली सार्वजनिक वाहतूक बस सेवा आहे. जी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (नाशिक महानगरपालिका SPV) द्वारे प्रदान केली जाते. सुमारे 250 बसेसच्या ताफ्याने नाशिक आणि आसपासच्या भागात 63 मार्गांवर चालवली जाते. सध्या हे मार्ग नाशिक परिसर आणि त्यातील सुमारे 20 चौरस मीटर क्षेत्र व्यापतात.

सुरवातीपासूनच या बससेवा वादग्रस्त राहिल्या आहेत. अजून ही ठेकेदार कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करत नसल्याने कर्मचारी वारंवार आंदोलनाचे हत्यार हाती घेत आहेत. यामुळे आता प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!