Accident : समृद्धी महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा ; पुन्हा अपघात होऊन इतके जण जखमी

0
22

Accident : समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांमुळे या महामार्गावरून प्रवास करावा की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसातून एक अपघात या महामार्गावर होत असल्याच समोर येत आहे.

समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे यातच पुन्हा एकदा कारचा अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे.

नागपूरकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार नियंत्रणाबाहेर गेली. आणि कार महामार्गावरच उलटल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून यात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ही घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये घडली आहे.

*अपघातात जखमी झालेल्यांची नावे.*

संतोष वाघमारे (वय, 20, रा. जाफराबाद), निखिल वकोडे (वय, 22) आणि सागर वाघमारे (वय, 23) अशी जखमींची नावे आहेत.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी व नागरिकांनी  घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरवात केली. दरम्यान अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

https://thepointnow.in/citilink-strike/

मात्र या अपघातात कारची माहिती घेत असतांना पोलिसांना अपघात झालेल्या कार मध्ये दोन वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट्स आढळून आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या कारचा नेमका नंबर कोणता असा प्रश्न पोलिसांना पडला असून त्यातच गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

त्यामुळे अपघात ग्रस्त कारच्या आढळून आलेल्या दोन नंबरप्लेट मुळे हे डिझेल चोरटे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

महिनाभरापूर्वीच बुलढाणा येथील सिंदखेड राजा जवळ धावत्या एसटी बसला आग लागल्याने यात जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान आणि गर्डन कोसळल्याने 20 जणांचा दुर्दैवी अंत झाला.

यामुळे या महामार्गा वर असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी काही काळासाठी हा महामार्ग बंद करण्यात यावा अशी मागणी देखील विधानसभेमध्ये केली गेली होती. या ठिकाणी दररोजच लहान मोठे अपघात घडत असल्याने महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 900 जणांचा यात मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

यामुळे या महामार्गाचा ऑडिट करून या ठिकाणी होत असलेले अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी व्यक्त केली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here