Rape and murder : राज्यात फक्त महिला नाही तर लहान मुलीही सुरक्षित नाहीत? ; अल्पवयीन बालिकेवर अत्याचार, मग हत्या आणि मृतदेह लपवला गोठ्यात


Rape and Murder एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिचा खुन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा नराधम इतक्यावरच न थांबता त्याने या चिमुरडीचा मृतदेह जनावरांच्या गोठ्यामध्ये असलेल्या चाऱ्यात तीन दिवस लपवून ठेवला होता. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या गोंडगाव येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.(rape and murder)

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्या प्रकरणी संशयित आरोपीला गावकऱ्यांच्या ताब्यात मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली असून  या दगडफेक मध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वाहनाचेही यात मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गावकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याची देखील माहिती आहे.(rape and murder)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी अल्पवयीन चिमुकली कल्याणी हिचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी संशयित स्वप्नील विनोद पाटील याला ३ ऑगस्ट रोजी अटक केली. दरम्यान संशयित स्वप्नील याला अटक केल्यानंतर त्याची जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.(rape and murder)

या घटनेने परिसरात तणावाचे वतावरण निर्माण झाल्याने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास संशयित स्वप्नील याला ५० पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तात घटनास्थळाच्या पडताळणीसाठी गोंडगाव येथे नेण्यात आले.(rape and murder)

https://thepointnow.in/accident-3/

दरम्यान संशयित नराधमाच्या आमच्या हवाली करा, अशी मागणी करत ग्रामस्थांनी परिसरात गोंधळ घातला आणि संशयिताला ताब्यात घेण्यावरुन पोलीस आणि जमाव यांच्यात वाद देखील झाला. यामुळे संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली असून यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी जखमी झाले आहेत तर पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.(rape and murder)

नेमकं काय घडलं?

संशयित स्वप्नील याने काही दिवसांपूर्वी अल्पवयीन चिमुकली कल्याणी हिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिच्या डोक्यात दगड घालत तिची हत्या केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्यानंतर त्या नराधामाने तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात असलेल्या चाऱ्यामध्ये लपवून ठेवला होता. मात्र, दोन दिवसांनंतर   मृतदेहाचा कुबट वास येऊ लागल्याने गोठ्यामध्ये दुर्गंधी पसरायला सुरवात झाली व हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीस आला.(rape and murder)

ज्यात कडब्याच्या कुट्टीमध्ये कल्याणीचा मृतदेह आढळून आला. सदर गोठा हा संशयित स्वप्नील विनोद पाटील (वय १९, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला असून चौकशी साठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निलला अटक केली आहे. (rape and murder) याप्रकरणाचा तपास भडगाव पोलीस स्टेशन करीत आहे. मात्र घडलेली ही घटना अतिशय संताप जनक असून यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तर या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाभरातून करण्यात येत आहे.(rape and murder)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!