Nashik Crime | नाशकात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

0
40
#image_title

Nashik Crime | नाशकातील एकलहरे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ प्रथम वर्षाच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलीची छेड काढण्याची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देत, मारहाण करत, दमदाटी करून अर्धनग्न अवस्थेत रस्त्यात उभे करत ‘रॅगिंग’ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित भूषण धात्रक व चेतन वलवे या दोघांविरोधात महाराष्ट्र छळवात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime | नाशिकच्या सिडको येथे तरुणावर हल्ला करत अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

नाशिकरोड पोलिसांकडे दोघांविरोधात तक्रार देत रॅगींची फिर्याद दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील असून एकलहरे येथील मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निक महाविद्यालयात पदविकेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असून, दोन महिन्यांपासून तो महाविद्यालयाच्या वस्तीगृह वास्तव्यास आहे. शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पिडीत हा त्याच्या दोन मित्रांसह महाविद्यालय आवारालागत असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेला असता, तिथे त्याच महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाच्या वर्गात शिकणारा संशयित भूषण व त्याचा मित्र चेतन बसले होते. त्यावेळी ‘मित्रांना मारहाण का केली?’ असा प्रश्न विचारला म्हणून दोन्ही संशयीतांना राग आल्याने त्यांनी पीडित विद्यार्थ्यास मारहाण केली.

Nashik Crime | नाशकात अवैध बायोडिझेल विक्रीवर रोख लागणार; जिल्हा प्रशासनाकडून तपासणी पथके तैनात

दोघा संशयीतांनी पिडीतला धरून बळजबरीने शर्ट काढायला लावले. तसेच मुलीची छेड काढल्याची खोटी तक्रार देण्याची भीती घालून पीडित विद्यार्थ्याला हॉटेलच्या बाहेर आणत, सार्वजनिक रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत उभे केले. यामुळे पीडित विद्यार्थ्यावर मानसिक आघात झाला असून त्याने नाशिकरोड पोलिसांकडे दोघांविरोधात तक्रार देत रॅगींची फिर्याद दाखल केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here