Skip to content

Online gaming : ऑनलाइन गेमिंग मध्ये फसवणूक करणाऱ्या अनंत जैन कडे मिळालं इतक्या कोटीं घबाड


Online gaming : ऑनलाईन ग्रीमिंगच्या प्रकरणातून एका व्यापाऱ्याची अनंत जैन याने तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी अनंत जैन याची बँक खाते पोलिसांकडून तपासण्यात आली असतात त्यातून चार कोटी रुपयांचं सोनं अडीच कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.(Online gaming)

गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंगची प्रचंड क्रेच तरुण वर्गामध्ये दिसून येत आहे कमी वेळेमध्ये जास्त पैसा कमावण्याचा कष्टविरहित साधन म्हणून ऑनलाईन गेमिंग कडे बघितलं जातं आणि यात अनेकांकडून मोठ्या गुंतवणूक देखील केल्या जातात. मात्र यामध्ये तितकाच धोका देखील सांभावतो. अनेक जणांनी या ऑनलाइन गेमिंग मध्ये पैसे गुंतवल्यामुळे ते अक्षरशः बरबाद झाल्याच्या तसेच कित्येक जणांनी आत्महत्या देखील केल्याचं समोर आलं आहे.(Online gaming)

https://thepointnow.in/rape-and-murder/

आरोपी अनंत जैन या व्यक्तीने ऑनलाइन गेमिंग च्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यापाऱ्याने नागपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण समोर आलं होतं दरम्यान या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नागपूर पोलिसांनी आनंद जैन विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास सुरू केला यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन गेमिंग ॲप तयार करून हजारोंना फसवणारा बुकी अनंत जैन याच्या विविध बँकांमधील लॉकरमध्ये चार कोटी रुपयांचं सोन अडीच कोटी रुपये रोख रक्कम आढळून आले आहेत पोलिसांकडून हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला असून त्याच्या फरार नातेवाईकांचा देखील पोलीस शोध घेत आहेत.(Online gaming)

अनंत जैन याने तक्रारदार व्यापारासह अनेकांना आपल्या जाळ्यामध्ये अडकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असल्याच देखील बोलले जात आहे. गोंदिया मध्ये राहणाऱ्या अनंत जैनच्या घराची पोलिसांकडून झडती देखील घेण्यात आली. यामध्ये 17 कोटींची रोख रक्कम, साडेबारा किलो सोनं आणि 300 किलो चांदी असा 27 कोटी रुपयांचा ऐवज देखील जप्त करण्यात आला होता.(Online gaming)

पुढील तपासात गोंदिया मधील विविध बँकांमध्ये अनंत जैन याचे चार लॉकर असल्याचे आढळून आलं असून या लॉकरची देखील झडती घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. यामुळे येत्या काळात याप्रकरणी अनंत जैनने लांबवलेली अनेक जणांचे पैसे जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!