Nashik Teachers Constituency Result |’साहेब तुमचा शब्द खरा ठरला, उबाठा..’; विजयानंतर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा फोन

0
38
Nashik Teachers Constituency Result
Nashik Teachers Constituency Result

Nashik Teachers Constituency Result :  नाशिक शिक्षक मतदार संघासाठीची मतमोजणी प्रक्रिया तब्बल ३० तास सुरू होती. अटितटिच्या या लढतीत शिंदे गटाच्या किशोर दराडे यांनी बाजी मारली असून, नाशिकचा गड राखण्यात शिंदे गटाला मोठे यश आले आहे. आज सकाळी हा निकाल जाहीर झाला आणि किशोर दराडे दुसऱ्यांदा नाशिक शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार झाले. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही किशोर दराडे यांना फोन केला आणि त्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री आणि किशोर दराडे यांच्यात काय बोलणे 

उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊ चौधरी यांच्या फोनवरून किशोर दराडे विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी “साहेब, इथे तुमचा शब्द खरा ठरला. उबाठा तिसऱ्या नंबरवर आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचा दारुण पराभव करून मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आहे,” असे किशोर दराडे मुख्यमंत्र्यांना म्हणाले.

Nashik Teachers Constituency Election | सस्पेन्स संपला; नाशिकचा गड शिंदेंच्या शिवसेनेनेच राखला

Nashik Teachers Constituency Result | मतमोजणी दरम्यान गोंधळ 

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी ही काल सकाळी आठ वाजेपासून सुरू होती. मात्र, येथे दोन वेळा मतपेटीत मतपत्रिका जास्त आढळल्याने वाद निर्माण झाला होता. उबाठा गट आक्रमक झाला आणि मतमोजणी थांबवण्यात आली. मात्र, नंतर पुन्हा मोजणी सुरळीत झाली. या प्रकरणाची दखल थेट मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांनीही घेतली होती. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून फोनवरून माहिती घेतली. या निवडणुकीत एकूण ६४ हजार ८५३ मतदान झाले होते. त्यापैकी १ हजार ७०२ मतं अवैध ठरवण्यात आली.

Nashik Teachers Constituency Result | नाशिकमधील मतमोजणीतील गोंधळाची उद्धव ठाकरेंकडून दखल; मातोश्रीवरून नाशिकमध्ये लक्ष

दराडे आणि कोल्हेंमध्ये चुरशीची लढत 

दरम्यान, मतमोजणीसाठी एकूण ३० टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६४ हजार ८५३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली. ३० तास ही मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाला होता आणि आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होती.

यात पहिल्या आणि दुसऱ्याही पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर राहिले. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) असल्याने या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, या लढतीत किशोर दराडे विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर विवेक कोल्हे आणि तिसऱ्या क्रमांकावर ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here