Ambadas Danve | आईबाहिणीवरून शिवीगाळ केल्याने विधानपरिषदेत राडा; विरोधी पक्षनेते निलंबित 

0
18
Ambadas Danve
Ambadas Danve

मुंबई :  काल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या प्रकरणी आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पुढील पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आज सकाळीही प्रसाद लाड हे एकटेच विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते.

Ambadas Danve | नेमकं काय घडलं..?

यानंतर आता अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत (vidhanparishad) राडा झाला. यावरून प्रसाद लाड आणि दानवे (Ambadas Danve) यांच्यात वाद झाले. यावेळी आपल्याकडे हात करत असल्याने अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना आई बाहिणीवरून शिवी दिल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे आपल्याला रात्रभर झोप आली नसल्याचे आज लाड म्हणाले.

Dasara Melava | छाटू गद्दारांचे पंख….! अंबादास दानवे कडाडले 

सत्ताधाऱ्यांकडून निलंबनाची मागणी 

तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीदेखील प्रसाद लाड यांनी केली होती. आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. “अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत त्यांच्यासाठी अर्वाच्य भाषा वापरली असल्याने त्यांच्या बेशिस्त वर्तनासाठी त्यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे, अशी मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

आवाजी मतदानाने अंबादास दानवे निलंबित 

अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर नीलम गोऱ्हे (nilam gorhe) यांनी टाकला असता, आवाजी मतदानाने अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आणि त्यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली.

Shivsena UBT MNS Clash | ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनसे-ठाकरे गटाचा राडा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here