Skip to content

Nashik | भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; नाशकातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ


Nashik : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. कालच मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. उद्या मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या सुरक्षेचा आढावा घेतलेला. भुजबळांना आलेल्या धमकीच्या प्रार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे.(Nashik)

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे भुजबळांच्या नाशिकमधील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. भुजबळांना काल जीवे मागण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या भुजबळांच्या वाढदिवसानिमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांना भेटायला येणाऱ्या लोकांची तपासणीदेखील केली जाणार आहे. भुजबळांच्या थेट जवळ जाण्यासाठी मनाई असणार आहे. आजपासूनच भेटायला येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. भुजबळांना धमकी आल्यानंतर पोलिसात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. या प्रकरणी पुढील पोलीस अधिक तपास करत आहेत.

छगन भुजबळ धमकी प्रकरणावर रासपचे नेते महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ जानकर मैदानात उतरले आहेत. मंत्री  भुजबळ हे ओबीसी समाजाचे माईलस्टोन आहेत. भुजबळ आमचे दैवत आहेत. छगन भुजबळसाहेबांना धमकी देणार आहात तर बाकी समाज गप्प का गप्प बसेल? अशा धमक्या देऊ नका. हे अजिबात योग्य नाही. कायद्याने सगळ्यांना आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असं नेते महादेव जानकर म्हणालेत. छगन भुजबळांना धमकी देणं हे चूक आहे. छगन भुजबळ आमचे दैवत आहेत. त्यांना धमकी दिली जात असेल तर बाकीचा समाज अजिबात गप्प बसणार नाही. अशा धमक्या देऊ नका. या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असंही नेते महादेव जानकर म्हणालेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!