Skip to content

देवळात चोरट्याचं पुन्हा कमबॅक..पोलिसांच्या भुमिकेकडे लक्ष


देवळा : मधील विद्यानगर येथे शुक्रवारी (दि. १३) रोजी रात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून घरातील सामान अस्ताव्यस्त केलेले आहे. या घटनेचा अज्ञात इसमाविरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा शहरातील विद्यानगर येथील रहिवासी देविदास धर्मा ब्राम्हणकर हे गुरुवारी (दि. १२) रोजी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते.

Samsung च्या फोनवर 6800 रुपयांचा थेट डिस्काउंट; जाणुन घ्या कसा?

अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचं बघून रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी घरातून 20,000/-रु. किंमतीचे 04 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मुलाची बाळी आणि अंगठी पैकी 03 अंगठी प्रत्येकी 01 ग्रॅम वजनाची, तसेच अर्धा ग्रॅम वजनाची 02 कानातील बाळी प्रति ग्रॅम 5000 रु. प्रमाणे लोखंडी कपाटात ठेवलेले 5000/- रु रोख असे एकूण २५०००/- रुपयांचा मुद्दे माल चोरून नेला आहे आणि घरातील समान अस्ताव्यस्त करून चोरटे पसार झालेले आहेत. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडण्यासाठी लोखंडी टिकम रॉडचा वापर केलेला आहे.

Samsung च्या फोनवर 6800 रुपयांचा थेट डिस्काउंट; जाणुन घ्या कसा?

या घटनेमुळे शहरातील उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून,पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवणे गरजेचे बनलेले आहे. शहरात अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण नेहमी घडत असून,पोलिसांनी या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांकडुन करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!