Manoj Jarange | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी गावात आज भव्य स्वरूपात मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. यासभेत मनोज जरांगे यांचे भाषण होणार आहे. दरम्यान, या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव तसेच इतर समाजातील मनोज जरांगे यांचे समर्थक आंतरवाली गावात दाखल होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कधी झाली नाही अशी गर्दी ह्या सभेला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा इतिहास घडवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासोबतच मनोज जरांगे आजच्या भाषणातून नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange)
Samsung च्या फोनवर 6800 रुपयांचा थेट डिस्काउंट; जाणुन घ्या कसा?
या मुद्दयांवर असणार भाषण –
- शासनाला देण्यात आलेल्या ४० दिवसांची मुदत संपण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
- शनिवारी मेळावा संपताच रविवारपासूनच जरांगे पाटील आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
- आंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहील. पण उपोषणाची व्याप्ती वाढवण्यावर जरांगे पाटलांचा भर असू शकतो.
- मनोज जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती २४ ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबरपासून ते पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याची शक्यता आहे.
- मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आणि ओबीसीतून आरक्षण देणार असल्याचा शासन निर्णय हातात घेऊनच ते आंदोलन मागे घेणार असल्याचेही ते सांगणार आहेत.
- काही मंत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत, त्यांचाही समाचार घेण्याची शक्यत आहे.
- मराठा समाज मागासवर्गीय सिद्ध होण्यासाठी २६ पैकी किमान १३ गुण आवश्यक होते. गायकवाड आयोगाच्या अहवालात समाजाला २१.५ गुण दिले आहेत. याचादेखील उल्लेख ते भाषणात करू शकतात.
- मराठा समाजाच्या आंदोलनात आणि मराठा व ओबीसी समाजात सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोपही मनोज जरांगे पाटील सातत्याने करीत आहेत. त्यासंदर्भातही ते काही गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.
अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता…
आमरण उपोषण मागे घेतल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी १२ दिवसांचा राज्यव्यापी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेकडो गावांत सभा घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी १४ ऑक्टोबरच्या सभेसाठी येण्याचे निमंत्रणही दिले होते. त्यामुळे एक दिवस आधीपासूनच मराठा समजबांधव आंतरवाली गावात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजच्या सभेला लाखोंची अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी त्यानुसार सोयीसुविधा देखील उभारण्यात आल्या आहे.
देवळात चोरट्याचं पुन्हा कमबॅक..पोलिसांच्या भुमिकेकडे लक्ष
जालना जिल्ह्यातील व अंबड तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी..
मनोज जरांगे यांची आज आंतरवाली सराटी या गावात आरक्षणाच्या मागणीसाठी जाहीर सभा पार पडत आहे. या सभेसाठी संपूर्ण राज्यातून मराठा समाज आंतरवाली गावात येण्यास सुरुवात झाली आहे . यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. याबरोबरच सर्व प्रमुख रस्त्यांवर देखील मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सर्वच शाळांना आज सुट्टी देण्याकहा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे याबाबतचा आदेशदेखील काढण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम