Skip to content

Samsung च्या फोनवर 6800 रुपयांचा थेट डिस्काउंट; जाणुन घ्या कसा?


Samsung | Amazon वर Great Indian Festival सेल सुरु झालेला आहे. रोज इथे डील ऑफ द डे दिली जात आहे. आज ही ऑफर एका स्मार्टफोनवर दिली जात आहे. Samsung Galaxy M13 एक बजेट स्मार्टफोन आहे जो 38 टक्के डिस्काउंट म्हणजे 6800 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झालेला आहे. विशेष म्हणजे रोज डील बदलत असते. यामुळे ही डील फक्त आजच्या दिवसासाठी असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही स्वस्त फोन खरेदी करण्याचा विचारात असाल तर Galaxy M13 वर मिळणारी ऑफर तुमच्यासाठी आहे. (Samsung)

ह्या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे मात्र आज डील ऑफ द डे अंतगर्त हा 38 टक्के डिस्काउंटसह विकत घेता येणार आहे. त्यानंतर फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. याला Amazon  वर 5 पैकी 4.1 रेटिंग देण्यात आलेली आहे. तसेच इथे हा फोन EMI वर खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जात आहे. ह्यासाठी तुम्हाला 543 रुपयांचा हप्ता असेल. जर तुमच्याकडे एखादा जुना फोन असेल तर तुम्हाला 10,550 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. जर तुमचा फोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला फुल एक्सचेंज व्हॅल्यू मिळणार आहे आणि हा फोन तुम्ही फक्त 649 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

ह्यात 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आलेली आहे. ह्या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे.  ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. यासोबतच 5 मेगापिक्सलचा दुसरा आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर देण्यात आलेला आहे. फोनमध्ये फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर चालतो. जो वनयुआय कोर 4 वर आधारित आहेत. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह आहे. ह्यात 6.6 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!