Skip to content

Manoj Jarange | उपमुख्यमंत्र्यांनी ही येडपटं पाळलीच कशी?


Manoj Jarange:   गुणरत्न सदावर्ते यांनी माझ्या मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सदावर्ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात आग ओकणं कमी केलं पाहिजे. सदावर्ते हा फडणवीसांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी सदावर्ते यांना समज द्यायला हवी. मराठा समाजाला अंगावर घेऊ नका, असा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. अंतरवाली सराटी येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते. (Manoj Jarange)

या सभेसाठी मराठा समाजबांधवांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. या सभेत मनोज जरांगे काय बोलतील, याची उत्सुकता सर्वांना होती. या भाषणात मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पुन्हा एकदा मांडल्या. यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात जाणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय. नंतर ते म्हटले की, आता मध्ये एकजण उठला व मला अटक करा, अशी मागणी करत होता. तो उपमुख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता आहे, असं लोक म्हणत होते. फडणवीसांनी  ही येडपटं पाळलीच कशी? असा खोचक टोलाही जरांगेंनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना लगावला.

Nashik | भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; नाशकातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ

सदावर्ते म्हटले की, मराठा समाज हिंसा करू शकतो, यामुळे मनोज जरांगे यांना अटक करावी. ही मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाहीये. आझाद मैदानावर जेव्हा सदावर्तेनी आंदोलन केलं होतं तेव्हा यश मिळावं यासाठी त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा दिली होती. आता इथे एक लाख मराठे एकत्र आलेत, आणि त्यांचे कल्याण होणार आहे. तर सदावर्ते म्हणताय की मला अटक करा. आता मला अटक करणं सोपं आहे का?  फडणवीसांनी  सदावर्तेंना समजवावं. त्यांनी समाजाला अंगावर घेऊ नये. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यात मराठा समाजाचा मोलाचा वाटा आहे. पंतप्रधान मोदींनीही देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. हे खालचे कार्यकर्ते मराठ्यांच्या अंगावर पाठवले जाताय, असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हटले. केंद्र आणि राज्य सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. विजयानंतर ट्रक दिल्लीपर्यंत आणू आणि तुमच्यावर गुलाल उधळू, असेही जरांगे-पाटील म्हटले. राज्य सरकारने येत्या १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. नाहीतर, २२ ऑक्टोबरला तुम्हाला काय करायचं ते सांगू. आपल्याला यापुढील आंदोलनही शांततेच्याच मार्गाने करायचे आहे. शांततेच्याच मार्गाने मराठा समाज आरक्षण मिळवेल, हा माझा शब्द आहे, असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Manoj Jarange | लाखोंचा जनसमुदाय उसळला…जरांगेंच्या टार्गेटवर कोण ?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!