Nana Patole | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीत ताकद पणाला लावली असून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी, “महाराष्ट्राला वाचवायचे आहे. महाराष्ट्र आज विनाशाच्या उंबरठ्यावर असून महायुतीमध्ये विरोध अधिक आहे. महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून जास्तीत जास्त जागा मिळवून सरकार स्थापन करणार” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
Nana Patole | ‘मी अनेक खुर्च्या…’; मुख्यमंत्रीपदावरून नाना पटोलेंनी केल्या भावना व्यक्त
राहुल गांधींच्या नाराजी वृत्तावर केले भाष्य
“देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र असले तरी ते आकडे खेळण्यात माहीर आहेत. या लोकांचा जनतेने लोकसभेत पराभव केला आहे. भ्रष्टाचारामुळे तिजोरी रिकामी झाली असून भाजप खोटे बोलण्यात माहीर आहे. हे लोक राहुल गांधी परदेशात काय बोलले ते समजून घ्यायला तयार नाहीत. महागाई व शेतकरी यावर चर्चा करायला तयार नाहीत. राहुल गांधींच्या नाराजीच्या वृत्तावर आता नाना पटोले यांनीही वक्तव्य केले आहे.
Nana Patole | धनगर आरक्षणावरून नाना पटोलेंचा महायुती सरकारवर घणाघात
जनता मविआच्या बाजूने….
“ही निवडणुकीची प्रक्रिया आहे. ज्याचे चुकीचे फॉर्म असतील तो बाद होणार. हे कसे होते हे अद्याप माहित नाही. महाविकास आघाडीत बंडखोरी राहणार नाही याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत. ‘पुन्हा येईन’ असे म्हणून फडणवीस यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा म्हणतायत तर त्यांचे नुकसानच होईल. जनता यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे मविआचेच सरकार येणार आहे. असे म्हणत रश्मी शुक्ला यांची बदली आधी निवडणूक आयोगाने करावी, महासंचालक सर्वांना सूचना करतात. त्यामुळे त्यांची बदली व्हावी, मग सुधार होईल.” असे देखील ते म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम