Congress Politics | उमेदवारीवरून मविआत धुसपुस कायम; काँग्रेसच्या बंडखोरांनी पक्ष नेत्यांचे आदेश धुडकावले

0
13
#image_title

Congress Politics | इगतपुरी व नाशिक मध्ये दोन मतदारसंघांत काँग्रेसने नेत्यांना त्यांच्या चुका चांगल्याच भोवल्या आहेत. आज पक्ष नेत्यांनी बंडखोरांना केलेले आवाहन नेत्यांनी धुडकावून लावले असून बंडखोरीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसच्या इच्छुकांनी नाशिकमध्य मतदारसंघात निवडणुकीची जंगी तयारी केली होती. या मतदारसंघात माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, हनिफ बशीर व पक्षाचे प्रदेशाची राहुल दिवे यांच्यासह अन्य काही इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोठी ताकद पणाला लावली. परंतु काँग्रेसचे वरिष्ठ नेते हक्काचा हा मतदारसंघ राखू शकले नाहीत व महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मिळाला.

Nashik Political | नाशिक पूर्व मतदारसंघात डमी उमेदवार देण्याची खेळी; गणेश गीतेंचा गंभीर आरोप

बंडखोरांची समजूत घालण्याचे प्रयत्न 

या मतदारसंघातून आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार यांनी मोठा शक्ती प्रदर्शनकरित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. विविध नेते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र बंडखोरांची समजूत घालण्यात त्यांना अद्याप यश आलेले नसल्याचे पाहायला मिळत आहे. बंडखोर डॉ. हेमलता पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करीत प्रचार सुरू केला असून, ती बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान स्थानिक नेत्यांपुढे येऊन ठाकले आहे. अशीच स्थिती इगतपुरी मतदारसंघात झाली असून वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीचा फटका या पक्षातील स्थानिक नेत्यांना बसला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अन्य नेत्यांशी योग्य समन्वय नसल्याने पक्षाला फटका बसल्याचा आरोप स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. इगतपुरी मतदारसंघात लकी जाधव या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्याने या उमेदवाराला मतदारसंघातून प्रचंड विरोध केला जात असून निषेध नोंदवत 65 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले आहेत.

Political News | ‘इतकी वर्ष झोपले होते का?’; आर. आर. पाटलांवरील वक्तव्यावरून आव्हाडांनी अजित पवारांवर साधला निशाणा

बंडखोरांना निवडणुकीतून माघार घेण्याचे आवाहन

जाधव यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी एकही पदाधिकारी सोबत जाण्यास तयार झाला नाही. त्यामुळे लकी जाधव या उमेदवाराची प्रचंड कोंडी झाली असून हा उमेदवार प्रचार कसा करणार असा मोठा प्रश्न समोर आहे. या मतदारसंघातू माजी आमदार निर्मला गावित या प्रबळ उमेदवार होत्या. परंतु त्या शिवसेनेचे उपनेते होत्या काँग्रेसच्या उमेदवारासाठी त्यांनी प्रयत्न केले. मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार गावित यांच्या उमेदवारीचा एकमुखी ठराव व शिफारस केली होती. यानंतर देखील नेत्यांनी वेगळ्याच उमेदवाराला उमेदवारी दिली. ज्यामुळे आज मुंबई पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोरांना निवडणुकीतून माघार घेण्याचे आवाहन केले. मात्र त्याला किती प्रतिसाद मिळेल याविषयी साशंकता आहे. नाशिक व इगतपुरी मतदार संघातून मात्र सर्व बंडखोरांनी पक्ष नेत्यांचे हे आदेश धुडकवून लावले असून माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करणार असल्याचे सांगत माघार घेण्याचा प्रश्नच नाही. असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांचे आदेश स्थानिक पदाधिकारी धुडकावून लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here