Nana Patole | मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा वर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला असून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ही मागील अनेक दिवसांपासून धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करत आहेत. 9 सप्टेंबर पासून उपोषण सुरू असून आता यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Nana Patole | शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
“2014 मध्ये भाजप आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आज दहा वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याबद्दल कोणतेही पाऊल उचलली गेली नाहीत. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाने उपोषणाची हाक दिली असून याबद्दल नाना पटोले यांनी भाष्य करत देवेंद्र फडणवीसांनी धनगरांना फसवण्याचे काम केले, तसेच एकनाथ शिंदे देखील करत आहेत.” असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला.
शिंदे धनगरांना फसवत आहेत
“महायुती सरकारचे नेते धनगर आणि आदिवासी असा वाद पेटवण्याचे काम करत आहेत. एसटी मधून आरक्षण देणार सांगतात पण आदिवासींचा रोष हे सरकार पत करणार का? हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक समाजाला यांनी आरक्षणाची आशा दाखवली आहे हे सरकार काम करत असल्याचे दाखवते, आश्वासनही दिले आहे पण आता निवडणुकीनंतर यांना याची किंमत चुकती करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Nana Patole Car Accident | नाना पटोलेंना चिरडून मारण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेत्याचा दावा..?
धनगरांना एसटी मधून आरक्षण देण्यासाठी विरोध
“हे सरकार रंगांमध्ये खेळत आहे. यापेक्षा राज्यामध्ये काय सुरू आहे हे राजकारण्यांनी पहावे. आमचा धनगरांना एसटी मधून आरक्षण देण्यासाठी विरोध असेल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम