Nana Patole | “मी तोंडपूजेपणा करण्यात पटाईत असतो, तर केंद्रात आत्ताच्या आणि मागच्या दोन्ही टर्म मध्ये मंत्री राहिलो असतो. जिथे खुर्ची घेऊन जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काम केलं असतं. पण ती खुर्ची माझ्या काही कामाची नसती. मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस आहे. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी वापरण्याची माझी क्षमता आहे.” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Nana Patole | धनगर आरक्षणावरून नाना पटोलेंचा महायुती सरकारवर घणाघात
“खुर्चीसाठी कधीच लढलो नाही- नाना पटोले
नाना पटोलेंनी, “मी खुर्चीची लढाई लढली नसून, कायम जनतेची लढाई लढली आहे. त्यामुळे मला फळ काय मिळते यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत होईल, महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा मिळेल यासाठीच काम करीत राहिलो आहे. मी फळाची चिंता करण्यापेक्षा कर्मावर लक्ष ठेवणारा आहे. मला चमचेगिरी करायची असती तर मी केंद्रात मागच्या आणि आताच्या टर्मलाही मंत्री राहिलो असतो. जिथे मला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काम करता आलं असतं. पण ती खुर्ची माझ्या काहीच कामाची राहिली नसती. मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस असून खुर्च्यांची लढाई कधीच लढलो नाही. माझा कर्मावर विश्वास आहे आणि माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचा मी शिष्य आहे. ते मला सांगायचे वेळेच्या पहिले आणि नशिबाचा जास्त काही प्राप्त होत नसतं. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची क्षमता माझ्यात आहे. त्यामुळे आज त्याची काळजी डोक्यात न ठेवता महाराष्ट्रामधील जनतेला न्याय कसा मिळेल हे माझे स्वप्न आहे. तेव्हा जनतेचा कौल आणि उद्याच्या नेतृत्वाचा निर्णय याचे आम्ही स्वागत करतो.” असे देखील त्यांनी म्हटले आहे.
तसेच, “काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन चालायचे हा सध्या आमचा विचार असून आम्ही उघडपणे भूमिका मांडतो, कुणालाही धोका देत नाही, लहान भाऊ, मोठा भाऊ यातही आम्ही पडलो नाही. जे काही आम्हाला मिळाले यातून चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
Nana Patole | शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
“आम्ही कोणालाही घाबरत नाही”
“विधानसभा निवडणुकीतही आमची हीच भूमिका असून जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन चालायचे जे सोबत नाहीत त्यांची चिंता करायची नाही लोकसभा निवडणुकीवेळी आमचे अनेक नेते पक्ष सोडून गेले. परंतु आम्ही चिंता करत बसलो नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर नवीन नेतृत्व उभं करून आम्ही तिथे जिंकलो. तेव्हा आम्ही कोणाला घाबरत नाही. मैत्री करतो, ती निभावतो. काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष असून शेतकऱ्यांचा, तरुण मुलांचा पक्ष आहे.” असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम