Nana Patole | ‘….तर राजकारण सोडलेले बरे!’; इव्हीएमच्या मुद्द्यावर नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

0
22
#image_title

Nana Patole | नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी महायुतीने बहुमताने विजय मिळवला. यानंतर महाविकास आघाडीकडून निवडणुक प्रक्रियेवर शंका उपस्थित करण्यात आली. या संदर्भात ‘मविआ’तील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर संशय व्यक्त केला आहे. तसेच या विरोधात आमचे आमदार व उमेदवार कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Nana Patole | ‘हि चर्चा केवळ मीडियातच’; राजीनाम्याच्या चर्चांना नाना पटोलेंनी दिला पुर्ण विराम!

नेमके काय म्हणाले नाना पटोले? 

यावर्षीच्या मतदानामध्ये 7.87 टक्क्यांनी वाढ झाली असून 76 लाख मते संध्याकाळी 5-6 दरम्यान पडलेली आहेत. याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नसून महाराष्ट्रात 5 लाखांहून अधिक मत आली. मग ती आली कुठून? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीने देखील निवडणुकीवर आक्षेप घेतला असून याबाबत त्यांनी व्हिडिओ दाखवला आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळली नाही.” असा आरोप देखील त्यांच्याकडून यावेळी करण्यात आला.

निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

7 वाजता मतदान झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशिरा देण्यात आला. निवडणूक आयोगाकडून संध्याकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदानाची टक्केवारी देण्यात आली. परंतु त्यांच्याकडून रात्री 11:30 वाजता 62.2% मतदान झाल्याचे सांगण्यात आले. यावरून साडेसहा तासांमध्ये मतदान करून घेतल्याचे समोर येत असून दुसऱ्या दिवशी आयोगाकडून 66.5% मतदान झाले. असे सांगण्यात आले. मतदानानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत दिली जाते. ही पद्धत आहे. परंतु महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची पत्रकार परिषद घेतली नाही.

Nana Patole | पराभवाची जबाबदारी घेत नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार?

राजकारण सोडलेले बरे! – नाना पटोले

त्यामुळे या निवडणुकीत 76 लाख मतांची वाढ झाली असून निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जनतेची मते चोरणे, टाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचे यातून सिद्ध होत आहे. याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. भाजपाने महाराष्ट्राला ताब्यात घेण्याचे 2020 सालीच ठरवले होते. पक्ष फोडले, चिन्ह घेतले, न्याय व्यवस्था हाती घेतली, सर्व बेकायदेशीर असून सुप्रीम कोर्ट यात लक्ष घालायला तयार नाही. असेत सुरू राहिले तर राजकारणात राहायचं कशाला? राजकारण सोडलेले बरे!” असे देखील ते यावेळी म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here