BJP Political | राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून सत्ता स्थापनेपूर्वी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटाकडून विधिमंडळाच्या नेत्यांची निवड केली आहे. त्यानंतर आता भाजपच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर आली असून भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची उद्या मंगळवारी पक्षाच्या निरीक्षकांकडून निवड केली जाणार असल्याचे समजते आहे. त्याकरिता भाजपने निरीक्षकांची निवड केली आहे.
विधिमंडळ नेत्यांच्या नेमणुकी करिता उद्या भाजपचे निरीक्षक मुंबईत
मागील काही दिवसांपासून विधिमंडळ नेत्यांची नेमणूक करण्याकरिता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची निवड करण्यात आली असून भाजपने निरीक्षक म्हणून विजय रुपाणी व निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. या निरीक्षकांकडून उद्या म्हणजे मंगळवारी विधिमंडळ नेते, प्रतोद, गटनेत्याची निवड केली जाणार आहे.
4 डिसेंबर रोजी गटनेत्याची निवड केली जाणार
या दोन्ही निरीक्षकांच्या नेमणुकीनंतर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार असून विजय रूपाणी आणि निर्मला सितारामन हे दोन्ही केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात येऊन जबाबदारी घेणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नेमणूक केलेले निरीक्षक उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी संध्याकाळपर्यंत मुंबईत येणार आहेत. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी भाजप विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता गटनेत्याची निवड केली जाणार आहे.
दरम्यान, भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी, “पक्षाच्या संसदीय बोर्डाने महाराष्ट्रातील भाजपचे विधिमंडळ नेते निवडी करता निर्मला सीतारामन व विजय रूपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.” असे म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम