Ajit Pawar | महायुतीने विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 230 जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला. तर यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला असून या विजयानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दिल्लीला आले होते. आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर सत्ता स्थापनेविषयी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार होती. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार आणि कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केले असून यावेळी बोलताना त्यांनी, डिसेंबरनंतर पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेणार असून पुढील जबाबदाऱ्या निश्चित करणार आहे.
Ajit Pawar | ‘उद्याच्या चर्चेत अंतिम निर्णय होतील’; दिल्लीतील बैठकीबाबत अजित पवारांनी सगळंच सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री पदाबाबत फडणवीस यांना पाठिंबा देणार का? असा सवाल विचारला असता अजित पवारांनी, “भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री त्यांचाच होईल. त्यांचे आमदार जा नेत्याला पाठिंबा देतील. त्याला आमचे समर्थन असेल. हे आम्ही आधीच जाहीर केले होते.” त्याचबरोबर, एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्रीपदासाठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल असे जाहीर केले आहे.” असे देखील ते म्हणाले.
Ajit Pawar | ‘भाजप हा मोठा पक्ष…’; मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांच मोठ विधान!
दिल्लीतील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी लढवणार असल्याचे संकेत
तसेच, फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत. तर “कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार.” असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम