सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | नेत्यांशिवाय सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेऊन एक लाखाहून अधिक मताधिक्याने मतदार संघातील जनतेने मला तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवले असून, या जनतेची मी कधीही प्रतारणा होऊ देणार नसून, आगामी काळात पाणी, आरोग्य सेवा, वीज, रस्ते आदी विकास कामांना प्राधान्य देऊन देवळा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असून जनतेने निश्चिंत राहावे. असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार डॉ. राहुल आहेर यांनी येथे केले.
Deola | देवळ्यातील मेशी येथे ट्रॅक्टरच्या रोट्याव्हीटरमध्ये अडकून एकाचा मृत्यू
रविवारी आमदार डॉ. आहेर यांचा आभार मेळावा आयोजित करण्यात
रविवारी दि. १ रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार डॉ. आहेर यांचा आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या आभार मेळाव्यास भाजप, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय(अ), मित्र पक्ष व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितानी आमदार डॉ. आहेर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम