Nana Patole | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला असून केवळ सोळाच आमदारच निवडून आले आहेत. त्यामुळे ही नामुष्की ओढवल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होत होती. पण त्यांनी हे वृत्त फेटाऊन लावले आहे. नाना पटोले यांनी आज दुपारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असून राज्यातील निकालाबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु राजीनाम्याबाबत बैठकीत कसलीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हि चर्चा केवळ मीडियात झाली असून पक्षांने ही आपल्याशी याबाबत काही चर्चा केली नसल्याचे सूचक विधान पटोले यांच्याकडून करण्यात आले.
नेमके काय म्हणाले नाना पटोले?
खरगे यांनी निकालाबाबत सविस्तर माहिती दिल्याचेही पटोलेंनी सांगितले. तसेच “विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आहे. हे मशीनने तयार झालेले सरकार आहे. लोकांनी नोट, दारू जिहाद पाहिला आहे. यामागील शुक्राचार्य कोण?” असा प्रश्न उपस्थित करत यावेळी त्यांनी महायुतीवर तोफ डागली. त्याचबरोबर, जनता आमच्या सोबत असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या मतांमध्ये मोठी तफावत जाणवत असून लोकसभेला मिळालेली मते व विधानसभेला मिळालेल्या मतांमध्ये एवढी तफावत कशी? असा सवाल करत शंका उपस्थित केली आहे.
Nana Patole | पराभवाची जबाबदारी घेत नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच पराभवाची जबाबदारी घेत पटोले यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी सुरू झाली होती. उमेदवार निवडीपासून मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून झालेल्या वादाला पटोले जबाबदार असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. उमेदवार जाहीर करण्यास विलंब केल्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यावरून कुरबुरी पाहायला मिळाल्या होत्या. त्याचा चुकीचा संदेश जनतेत गेल्याची देखील चर्चा आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम