Nana Patole | पराभवाची जबाबदारी घेत नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार?

0
26
#image_title

Nana Patole | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु पटोलेंच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंनी असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Nana Patole | ‘शिंदे, फडणवीस, पवारांनी महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला’; नाना पटोलेंचा युती सरकारवर हल्लाबोल

पटोले यांच्या कार्यालयाकडून राजीनाम्याच्या चर्चांना पुर्ण विराम

सूत्रांच्या माहितीनुसार, नाना पटोले यांच्या कार्यालयाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या राजीनामाची बातमी अफवा असून या संदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला असून काँग्रेसला 16, शिवसेनेला 19 तर राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असताना व लोकसभेत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला असताना देखील विधानसभा निवडणुकीत मात्र राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

Nana Patole | ‘महाराष्ट्र आज विनाशाच्या उंबरठ्यावर’; नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार? 

राज्यात झालेल्या पराभवाची काय कारण असू शकतील, याचे विश्लेषण करण्याकरिता नाना पटोले दिल्लीला वरिष्ठांच्या भेटीकरिता जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याच वेळी ते पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी 24 नोव्हेंबरला काँग्रेस हाय कमांडची भेट घेतली असून त्यानंतर आज नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून नाना पटोले हाय कमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर हाय कमांडकडून नाना पटोले यांना वेट अँड वॉच भूमिकेत ठेवण्यात आल्याची माहिती आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here