BJP Political | महायुतीने बहुमताने सत्ता स्थापन केल्यानंतर देखील अजून मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. निवडणुकांचे निकाल लागून 5 दिवस उलटून गेले असले तरी, महायुतीचे सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेत फडणवीसांचा मार्ग मोकळा केला आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्री पदासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अशातच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता यात वेगळाच ट्विस्ट आला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य केले असून, “भाजप नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर देते व त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपावते. मध्य प्रदेश व राजस्थान सारख्या राज्यांमध्ये देखील भाजपाने नवीन प्रयोग राबविले आहेत. परंतु महाराष्ट्रात असे प्रयोग होणार का? याबाबत मी काही सांगू शकत नाही. निवडणूक निकालानंतर सखोल चर्चा होत असून पक्षाच्या केंद्रीय समितीत विविध विषयांवर निर्णय घेतले जातात. कोणाला मंत्रीपद द्यायचे यावर आमचे नेते योग्य वेळी निर्णय घेतील. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडतो.” असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा पेज अद्याप सुटलेला नसून भाजपच्या निर्णय प्रक्रियेवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून फडणवीस मुख्यमंत्री होतील? की भाजप एखाद्या नवीन चेहऱ्यास पुढे करेल. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम