Manikrao Kokate | मंत्र्यांनो सुधरा नाहीतर रस्त्यावर यावं लागेल; आ. कोकटेंचा सरकारला घरचा आहेर

0
94
Manikrao Kokate
Manikrao Kokate

Manikrao Kokate | सिन्नर :  गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात बाचाबाची झाल्याची बातमी समोर आली होती. यावरुण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आक्रमक झाले असून, त्यांना महायुतीच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. मंत्र्यांनी नखरे केले तर, विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना रस्त्यावर यावं लागेल, असा इशाराच कोकाटे यांनी दिला आहे.

Manikrao Kokate | नेमकं प्रकरण काय..?

राज्याचे ग्रामविकास गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी रस्त्यांच्या योजनेसाठी अतिरिक्त निधी मागितला होता. यावेळी अर्थमंत्री अजित पवार संतापले आणि “मी पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायला काढायची का?” या शब्दांत त्यांनी गिरीश महाजन यांना सुनावले. त्यावर गिरीश महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता अजित पवार यांना सिन्नर मतदार संघातील स्मारकाच्या प्रस्तावाचा दाखला देत प्रत्युत्तर दिले. (Manikrao Kokate)

नाशिक जिल्ह्यातील अजित पवार गटात असलेले सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघात स्मारकासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मंत्रिमंडळात मांडला होता. त्याचीच आठवण करून देत मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “नको तिथे खर्च करायला नको, अशी तुमचीच भूमिका आहे, मग इथे तरी खर्च कशाला करायचाय..?” असा प्रतिप्रश्न महाजन यांनी अजित पवारांना केला आणि यामुळेच पुन्हा एकदा महायुतीच्या बड्या नेत्यांमध्येच निधी वाटपावरून सुरू असलेली खडाजंगी समोर आली.

Igatpuri | सीमंतिनी कोकाटे यांच्याकडून कातकरी वस्तीची पाहणी; प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन

मंत्र्यांचं काय सुरू हे यांनाच कळत नाही… 

दरम्यान, यावरुन माणिकराव कोकाटे यांनी संबंधित मंत्र्यांना घेरले आहे. “सगळ्याच मंत्र्यांमध्ये एकमेकांविरोधात स्पर्धा सुरू असून, यांचे काय सुरू आहे हे यांनाच कळत नाहीय. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी व मंत्र्यांना सर्व आमदारांची कामे मार्गी लावण्याबाबत तातडीने सूचना द्यायला हव्यात. आणि जर निधी वाटपावरून कोणत्याही मंत्र्यांनी नखरे केले, भांडण केले किंवा फाईल अडवली तर या मंत्र्यांना आगामी निवडणुकीनंतर रस्त्यावर यावं लागेल,” असा इशारा देत कोकाटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

“मंत्र्यांनो आता तरी सुधरा आणि लोकाभिमुख कामं करा, काही मंत्री महोदय, हे जबाबदारीने वागत नाहीत, नियमित मंत्रालयात येत नाहीत. लोकांची कामे, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांची कामे नीट करावी,” असा सल्लाही यावेळी आमदार कोकोटे यांनी दिला.(Manikrao Kokate)

Igatpuri | घोटी-भंडारदरा रस्ता झाला चकाचक; आ. कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे भाग्य उजळले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here