Igatpuri | सीमंतिनी कोकाटे यांच्याकडून कातकरी वस्तीची पाहणी; प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन

0
53
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | सिन्नर-इगतपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार माणिकराव कोकाटे  यांच्या कन्या व जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी टाकेद गटातील दौऱ्याप्रसंगी टाकेद बु. येथील आदिम कातकरी वस्तीची प्रत्यक्षात पाहणी करत आदिम कातकरी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावे. त्यांना अद्ययावत सुखसुविधा मिळाव्यात व त्यांची उन्नती व्हावी. यासाठी शासन विविध योजना राबवत असते. पण या योजना खरंच ग्रामीण भागात पोहचतात का..? त्यांचा लाभ गोरगरीब आदिवासींना मिळतो का.? व या प्रश्नांची गांभीर्याने दखल कोणी घेतं का…?

यासंदर्भातील सखोल माहिती सीमंतिनी कोकाटे यांनी स्वतः आदिम कातकरी बांधवांकडून प्रत्यक्षात पाहणी करत जाणून घेतली. शासनाच्या आदिम जनमन घरकुल योजनेतील जवळपास तीस कातकरी कुटुंबांचा घरकुल प्रश्न काही त्रुटीमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याकडे कुणीही लक्ष देत नाही. परंतु या घरकुल प्रश्नासंदर्भात सीमंतिनी कोकाटे यांनी इगतपुरीचे गटविकास अधिकारी प्रशांत पवार व टाकेद येथील ग्रामविकास अधिकारी शरद केकाने यांना संपर्क करत या विचारणा केली. तसेच लवकरच सीमंतिनी कोकाटे या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही या संदर्भात बैठक घेऊन टाकेदसह संपूर्ण परिसरातील कातकरी बांधवांचा घरकुल विषय मार्गी लावणार आहेत.

Igatpuri | घोटी-भंडारदरा रस्ता झाला चकाचक; आ. कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे भाग्य उजळले

दरम्यान या भेटी दौऱ्यात सीमंतिनी कोकाटे यांच्याशी सामाजिक कार्यककर्ते राम शिंदे यांनी टाकेद व परिसरातील विविध विषय समस्यांवर चर्चा केली. या सविस्तर आढावा चर्चासत्रात टाकेद परिसरातील जिओ नेटवर्कचा सातत्याने होत असलेला लपंडाव, इगतपुरी तहसील पुरवठा विभागातील इष्टांक ऑनलाइन डाटा एन्ट्री प्रश्न, टाकेद तीर्थ ते टाकेद गाव व परिसर रस्ता प्रश्न, सत्याई चौक कातकरी नगर ते जाधववाडी धानोशी रस्ता प्रश्न, टाकेद ते धामणगाव रस्त्यावरील अडसरे खुर्द गिरंगेवाडी फाटा, धामणगाव समृद्धी पूलाजवळील राहिलेले काँक्रीटीकरण, पूर्व भागातील लाईट प्रश्न अशा विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा केली.

यावर सीमंतिनी कोकाटे यांनी जिओ नेटवर्क संदर्भात संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करत हा प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या. तसेच टाकेद सत्याई चौक ते कातकरी नगर मार्गे जाधववाडी धानोशी रस्ता या बजेटमध्ये मंजुरीला असून लवकरच तो पूर्ण होईल. परंतु सध्या पुरते का होईना मुरूम टाकून सदर रस्ता शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासित केले.

Sinnar | आ. कोकाटे यांच्या प्रयत्नातून तातळेवाडी ते टाकेद खुर्द रस्त्याच्या कामाला सुरुवात

टाकेद तीर्थ ते टाकेद गाव याबाबत बोलताना तात्काळ वरिष्ठांकडे व स्वीय सहाय्यक संजय डावरे यांच्याशी संपर्क करत सदर रस्त्याचे टेंडर आज ओपन झाले असून लवकरच त्याचे कामकाज चालू करण्यात येईल. पावसाळा असला तरी सदर रस्त्याचे कामकाज पूर्ण करून घेण्याच्या सूचनादेखील त्यांनी यावेळी दिल्या. टाकेद ते धामणगाव रस्त्याचे राहिलेले भाग लवकरच काँक्रीट करण्यात येईल अश्या विविध विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा करून प्रत्येक प्रश्नांचा आढावा घेतला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, दौलत बांबळे, अरुण घोरपडे, डॉ. श्रीराम लहामटे, आनंदा कोरडे, विजय बांबळे, भगवान भोईर, आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

“गेल्या अनेक वर्षांपासून टाकेद येथील कातकरी समाज बांधव घरकुल योजनेपासून वंचित आहेत. जन मन आदिम घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना त्रुटी आल्याने ते आज वंचित आहेत. यावर शासनाने प्रत्यक्षात पाहणी करून पर्यायी मार्ग काढून सदर आदिम कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा”  – राम शिंदे, (सामाजिक कार्यकर्ते टाकेद)

“टाकेद येथील कातकरी वस्तीची प्रत्यक्षात पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधत घरकुल योजनेसह विविध समस्या जाणून घेतल्या. तीस कातकरी कुटुंबाच्या घरकुल प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लवकरच भेट घेत वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी लावणार आहे.”– सीमंतिनी कोकाटे, (जि.प सदस्या, सिन्नर)

“घरकुल योजनेसाठी अनेकवेळा ग्रामपंचायतमध्ये कागदपत्रे जमा केली. पण अजून आम्हाला घरकुल मिळाले नाही. वेठबिगारी, मासेमारी, ऊस तोडणी, मजुरी करून आमचे दिवस चाललेत. आमच्या झोपड्यांकडे कुणीच लक्ष्य देत नाही. पोटापाण्यासाठी सार रानोमाळ फिरवा लागत. तवा कुठ भाकर मिळते. सरकारने आमच्याकडे लक्ष्य द्यावा.” – गोदाबाई भोईर, (कातकरी वस्ती, ग्रामस्थ)

Igatpuri | आ. कोकाटे यांनी शब्द पाळला; डी.एल.सी धर्तीवर टाकेद ते धामणगाव रस्त्याचे काम पूर्ण


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here