Raj Thackeray | राज ठाकरेंची घोषणा.! महायुतीसोबत काडीमोड; काहीही करून आमदारांना सत्तेत बसवणार

0
48
Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray : मुंबई:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यात राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली असून, निवडणूक महायुतीसोबत नाहीतर स्वतंत्रपणे सवबावर लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच या निवडणुकीत ते 250 जागा लढवणार असल्याचे सांगत या जागांचा सर्वेही झाला असल्याचे यावेळी त्यांनी संगितले.

मुंबईत आज मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यात ठाकरे यांनी या महत्त्वाच्या घोषणा करत विधानसभेचे रणशिंग फुंकले. यावेळी विधानसभेत (vidhansabha election) कोणतीही आणि कोणाशीही युती करणार नसून, आपण 250 जागा लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. तर, विधानसभेच्या तयारीसाठी आपण 10 ऑगस्टपासून ‘महाराष्ट्र दौरा’ करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. (Raj Thackeray)

Raj Thackeray | मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार..?; राज ठाकरेंनी जाहीर केलं

Raj Thackeray |  मला काहीही करुन मनसेच्या आमदारांना सत्तेत बसवायचंय 

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून जय उमेदवारांना निवडून येण्याची क्षमता आहे. त्याच लोकांना उमेदवारी देण्यात येईल. एकदा तिकीट मिळालं की, मग मी पैसे काढायला मोकळा. अशा मनोवृत्तीच्या लोकांना तिकीट मिळणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत मला काहीही करुन मनसेच्या आमदारांना सत्तेत बसवायचे आहे. यावर आता अनेकजण हसतील तर, त्यांना हसू दे. पण आता ही गोष्ट घडणार म्हणजे घडणारच, असा निर्धारही राज ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवला.

Raj Thackeray | महायुतीत बिनसलं; राज ठाकरे विधासभेपूर्वी भाजपला देणार मोठा धक्का..?

युती होईल आणि किती जागा मिळतील हा विचार करू नका 

आम्ही सगळे निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. मी तयार केलेल्या टीम्स पुन्हा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात येतील आणि ते तुमच्याकडील आणि त्या भागातील संपूर्ण माहिती जाणून घेतील. त्यांना तुमच्या मतदारसंघातील मूळ परिस्थिती नीट सांगा. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी वास्तव माहिती त्यांना द्या. आणखी काय गोष्टी होऊ शकतात याचा विचार करा आणि मी पाठवलेल्या पक्षाच्या पथकांना सहकार्य करा. त्यानंतर युती होईल का, आणि मग आपल्याला कोणत्या आणि किती जागा मिळतील का, हे विचार मनात आणू नका. कारण आपण जवळपास 225 ते 250 जागा लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. (Raj Thackeray)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here