Mahavikas Aghadi | संजय राऊतांना घरचा आहेर; नानांनी चांगलंच खडसावलं

0
11
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi |  लोकसभा जागावाटपावरून महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही काही जागांवरून बिनसले असून, हा वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सांगली लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली असून, या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. दरम्यान, आता याच वादावरून ठाकरे गटाचे  खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात खडाजंगी झाली आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांना घरचा आहेर दिला असून,”संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी, आणि मर्यादा पाळावी, एखाद्या लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नये, या शब्दात पटोले यांनी राऊतांना सुनावले आहे.  (Mahavikas Aghadi)

Mahavikas Aghadi | …त्यांनी यात सुधार करावा

तसेच यावेळी नाना पटोले म्हणाले की,”लोकशाही विरोधातील हे भाजप सरकार हे कशाही प्रकारे सत्तेत यायला नको, यासाठी आम्ही कोणतेही परिणाम भोगायला तयार असून, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. असं असतानाही त्यांनी एखाद्या लहान कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करणं हे न पटण्यासारखं असून, त्यांनी यात सुधार करावा. या वादातून सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य हे पक्षाच्या मोठ्या नेत्याने करु नये, या शब्दात नाना पटोले यांनी राऊतांना घरचा आहेर दिला आहे. (Mahavikas Aghadi)

Dindori Loksabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं चाललंय तरी काय ?

संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, नौटंकी थांबवावी

खासदार संजय राऊत यांनी आपली मर्यादा पाळावी. त्यांनी आपली ही नौटंकी बंद करावी. ते ठाकरे गटाचे एक मोठे नेते असुन, संजय राऊतांनी एखाद्या लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये. दोन दिवसात सांगलीच्या उमेदवारीचा हा प्रश्न सामोपचाराने सोडवू, असा सल्ला नाना पटोलेंनी राऊतांना दिला.  (Mahavikas Aghadi)

आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर.. 

सांगलीच्या वादावर सांगली येथील एक सभेत बोलताना राऊत म्हणाले होते की,”सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू, असा इशारा राऊतांनी सांगलीतील भाजप उमेदवार संजयकाका पाटील व काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना दिला होता. दरम्यान, त्यांच्या याच टीकेला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे.(Mahavikas Aghadi)

Nashik Lok Sabha | उद्या राष्ट्रवादी भुजबळांच्या नावाची घोषणा करणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here