Vinesh Phogat | विनेश फोगाट अन् बजरंग पुनिया ‘राजकीय’ आखाड्यात

0
45
Vinesh Phogat
Vinesh Phogat

Vinesh Phogat |  ऑलिंपिक स्पर्धांदरम्यान जगभरात चर्चेत राहिलेली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हीने आपल्या रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देत नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तिच्यासह बजरंग पुनिया (Bajrang Punia) यानेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या केवळ 30 दिवसांपूर्वीच या दोघांनी काँग्रेसचा हात धरल्याने आता हे दोघे आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या (Haryana Assembly Polls) रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. विनेश फोगट जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर, बजरंगही निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

Vidhansabha Election | दोन राज्यांमध्ये विधानसभेचे बिगुल वाजले; महाराष्ट्रात निवडणूक कधी..?

Vinesh Phogat | काँग्रेसचा हात धरण्यापूर्वी रेल्वेतील नोकरीचा राजीनामा 

पक्ष प्रवेशापूर्वी या दोघांनीही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. हरियाणामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून, 5 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसमधील पक्षप्रवेशापूर्वी विनेश (Vinesh Phogat) आणि बजरंग या दोघांनी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. दोघेही उत्तर रेल्वेमध्ये ओएसडी स्पोर्ट्स पदावर कार्यरत होते. विनेशने सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करून आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यात आपण कौटुंबिक तसेच वैयक्तिक कारणांमुळे रेल्वेतील नोकरी सोडत असल्याचे जाहीर केले.

VidhanSabha Election | विधानसभेचे फटाके दिवाळीनंतर..?; उशीरा निवडणुकीचा फायदा कोणाला..?

विनेश विरोधात भाजपकडून चुलत बहिणीला तिकीट..?

विनेश फोगट (Vinesh Phogat) विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, काँग्रेसकडून तिला जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले जाऊ शकते. 11 सप्टेंबर रोजी विनेश आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, भाजपकडून या मतदारसंघात विनेशची चुलत बहीण बबिता फोगटला तिकीट दिले जाऊ शकते. बजरंग पुनियाकडून झज्जरच्या बदली सीटची मागणी करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसने येथील विद्यमान आमदार कुलदीप वत्स यांचे तिकीट कापण्यास नकार दिल्याने बजरंगला काँग्रेसमध्ये स्टार प्रचारकपदाची जबाबदारी तसेच संघटनेत पद दिले जाण्याची शक्यता आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here