Devendra Fadnavis | गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आपसातच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांची भूमिका ही हिंदूत्ववादी असून, अजित पवार गटाची भूमिका ही वेगळी असल्याचे दिसून येते. दरम्यान, यावर आता स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली का..?, दादांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला का.? अजित पवार हे गुलाबी झाले पण भगवे झाले नाही..?, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण..? या सर्व प्रश्नांची उत्तरं फडणवीस यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ कॉनक्लेच्या कार्यक्रमात दिली.
अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली का..?
अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपने कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही. अजित पवार यांना सोबत घेणं ही काळाची गरज असून, राजकारणात हाती आलेली संधी कधीही सोडायची नसते. अजितदादांबाबत (Ajit Pawar) घेतलेला निर्णय सेटल व्हायला वेळ लागेल. पण एकदा सेटल झालं की ही संधी घेतल्याचा आम्हाला फायदाही मिळेल, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.
Devendra Fadnavis | बांग्लादेशसारखी स्थिती इथे कोणाचा बाप तयार करू शकत नाही; फडणवीसांनी ललकारले
Devendra Fadnavis | अजित पवार हे गुलाबी झाले पण भगवे झाले नाही..?
अजित पवार हे काही दिवसांपुर्वी त्यांच्या सर्व आमदारांसोबत सिद्धिविनायकाला गेले होते. आपण अजितदादांना 40 वर्षांपासून राजकारणात पाहत आहोत. यापूर्वी त्यांना अशा गोष्टी करताना पाहिलेय का? आता ते आमच्यासोबत राहताय त्यामुळे त्यांना आमचे काही गुण तर लागणारच ना. तुम्ही काही काळजी करु नका. त्यांना हळूहळू आमचे सगळेच गुण लागतील, असं मिश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि एकच हशा पिकला.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण..?
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन वाद आहे का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन कोणताही वाद नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने त्याअर्थी तेच सरकारचा प्रमुख चेहरा असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis | फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद..?; राज्यात भाजपा नेतृत्वात फेरबदल होण्याची शक्यता
लोकसभेला दादा गटाचा पराभव का झाला..?
अजित पवारांसोबत युती करुन आम्ही चूक केलेली नही. गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष हा नवीन होता. आधी त्यांचीच मतं सेटल होण्याची गरज होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) त्यांची मतं भाजपला ट्रान्सफर करता आली नाही. मात्र या विधानसभा निवडणुकीत असं घडणार नाही, असा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम