Maharashtra Projects | राज्यात मोठमोठ्या कंपनींची गुंतवणूक; या जिल्ह्यांमध्ये नोकऱ्या वाढणार.?

0
24
Maharashtra Projects
Maharashtra Projects

Maharashtra Projects |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून नागरिकांना अनेक गुड न्यूज दिल्या जात आहेत. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना, लाडकी लेक योजना, अन्नपूर्णा योजना, यांसारख्या योजनांची घोषणा करण्यात आल्यानंतर महिला वर्गात आनंदाचे वतावरण असून, यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार आता राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक होणार असून, यामुळे काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, येणाऱ्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होण्याची शक्यता असून, यासाठी चार मोठे प्रकल्प (Big Projects in Maharashtra) राज्यात येणार आहेत. या माध्यमातून तब्बल 1.17 लाख कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक होणार असल्याने या भागातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. तर, या प्रकल्पांची गुंतवणूक ही पुणे, पनवेल, मराठवाडा, विदर्भ, या ठिकाणी होणार आहे. (Maharashtra Projects)

गुरुवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत पुढील चार मोठ्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, यात सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक व्हेईकल या प्रकल्पांचा सहभाग आहे. या प्रकल्पांमुळे या भागात तब्बल 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पुन्हा इथेनॉल तारणार साखर उद्योग; राज्यात नवीन ४० कारखान्यांत प्रकल्प, यंदाचे उद्दिष्ट ३०० कोटी लिटर

Maharashtra Projects | कुठे किती नोकऱ्या उपलब्ध होणार..?

पुणे येथे स्कॉडा ऑटो व फोक्सवॅगन इंडिया या नामांकित कंपनीचा एकात्मिक प्रकल्प सुरु होणार असून, या प्रकल्पात तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यातील या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशा इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत तब्बल 1000 नोकऱ्या उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Projects)

तर, पनवेल येथे टॉवर सेमीकंडक्टर कंपनी व अदानी समूहाच्या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरु होणार असून, या प्रकल्पात पहिल्या टप्प्यासाठी 58 हजार 763 कोटी तर दुसऱ्या टप्प्यासाठी 25 हजार 184 कोटी अशी एकूण 83,947 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 15 हजार नोकऱ्या उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Politics | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार..?; बघा नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा-किर्लोस्कर या मोटार कंपनीचा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा प्रकल्प येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 21 हजार 763 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, यातून साधारण 12 हजार नोकऱ्या उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.

राज्यात गुंतवणूक होणारा चौथा प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावतीमधील नांदगाव पेठ येथील अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत रेमंड लक्झरी कॉटन्सचा प्रकल्प सुरू होणार असून या प्रकल्पात स्पिनिंग, यार्न डाइंग, व्हिव्हींग ज्यूट, व्हिव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन यांचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पात तब्बल 188 कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 550 नोकऱ्या उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here