Nashik Politics | नाशकात जागावाटपावरून महायुती पाठोपाठ मविआत देखील रस्सीखेच

0
62
#image_title

Nashik Politics | लोकसभा निवडणुकानंतर आता राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत आता रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. तर सध्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. पण नाशिकच्या जागांवरून महायुतीप्रमाणेच आता महाविकास आघाडीमध्येही वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावे करण्यात आले असून नुकताच नाशिकच्या जागांवरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. त्या पाठोपाठच आता महाविकास आघाडीत देखील नाशिकच्या जागांवरून संघर्ष होणार असल्याचे असल्याची चिन्हे आहेत.

Nashik Politics | नाशकात जागांसाठी मविआत महासंग्राम?; जास्त जागा कोणाला मिळणार?

राष्ट्रवादी जिल्ह्यातील 15 पैकी 10 जागा लढवण्यावर ठाम

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीचे मुंबईमध्ये बैठकांचे सत्र सुरू असताना नाशिकमध्ये मात्र रस्सिखेच असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाच्या जागांवरती दावा ठोकला असून जिल्ह्यातील 15 पैकी 10 जागा लढवणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गीते आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची नावे विधानसभेसाठी निश्चित केली आहेत. मात्र या दोन्ही जागांवर शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. तेव्हा ही जागा मिळवण्यासाठी मविआमध्ये यावरून राजकारण होण्याची शक्यता आहे.

Nashik Politics | बडगुजर प्रकरणाला नवं वळणं; अंबड पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात

जयंत पाटील घेणार मतदार संघाचा आढावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहरातील तीन पैकी दोन जागा लढवण्याच्या तयारीत असून 23 सप्टेंबर पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनस्वराज्य यात्रा तीन दिवस नाशिक मध्ये येणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षाचे वरिष्ठानेते जिल्ह्यातील मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये वाद होणार असून आता नाशिक मधील जागा महाविकास आघाडीत नेमक्या कोणाच्या वाट्यायला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here