Bachchu Kadu | राज्यामध्ये विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या कामामध्ये व्यस्त आहेत. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या विरोधात श्रीरामपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्या प्रकरणी न्यायालयाने बच्चू कडू व रघुनाथ पाटील यांच्यासह 19 जणांविरोधात आरोप निश्चिती केली असून याबद्दलची पुढील सुनावणी 15 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती वकील बाबासाहेब मुठे यांनी दिली आहे.
Bachhu kadu | अन् संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी थेट अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली
नेमकं प्रकरण काय
एप्रिल 2017 मध्ये शेतकरी संघटनाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने श्रीरामपूर मधील मुठेवडगाव येथील शेती आणि पाणी प्रश्नांवर पटबंधारे कार्यालयात असून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हे आंदोलन आक्रमक झाले आणि आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला आणि अधिकाऱ्यांना काळे फसले होते. त्या साली हे आंदोलन फारच गाजले होते. त्यानंतर आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांच्यासह रुपेश काले, भाऊसाहेब मुठे, रघुनाथ मुठे, संजय गवारे, शिवाजी मुठे, चांगदेव मुठे, भास्कर शिंदे, पाराजी शिंदे, कालिदास आपेट, अजय महाराज भास्कर, अनिल औताडे, बाळासाहेब पठारे, रमेश मोठे, युवराज जगताप, भीकचंद मुठे, डॉक्टर शंकर मुठे, विलास कदम या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पटबंधारे कार्यालयातील कनिष्ठ लिपक दिलीप चव्हाण हे फिर्यादी असून या आंदोलनात यापूर्वी जामीन मंजूर झाला होता. श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन आंदोलकांविरुद्ध काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी दोषारोप निश्चित करण्यात आले. यावेळी आमदार कडू आणि रघुनाथदादा पाटील तेथे उपस्थित होते. त्यानंतर न्यायालयाचे कामकाज उरकल्यानंतर आमदार कडू रवाना झाले तर रघुनाथ दादांनी सरकारी विश्रामगृहावर थांबून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.
Nashik Political | नाशकात विधानसभेची धुमाळी; पश्चिम मतदार संघात महायुतीत चुरस
हे शेतकऱ्यांचे दुर्दैव…
या खटल्या निमित्त शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी स्थानिक नेत्यांवर निशाणा साधत “श्रीरामपुर मधील पाटपाण्याच्या प्रश्नावर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामधून नेते येऊन आंदोलन करतात. मात्र स्थानिक नेते काही बोलत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. सन 2012 पासून शेतकरी संघटनेने पाटपाण्याच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलने करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे.” असे म्हणत औताडेंनी स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम